Breaking News
जालना जिल्हामंठा तालुका

मंठा शहरात लॉकडाऊनचा बोजवारा ; सोशल डिस्टन्सीगला हरताळ.

मंठा न्यूज

: मंठा शहरात सोशल डिस्टन्सला हरताळ फासत नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत संपूर्ण विश्व कोरोनाची धास्ती घेत असताना मंठा शहरात मात्र नागरिक गांभीर्याने घेत नाहीत ही चिंतेची बाब आहे.

पोलीस प्रशासन आणि नगरपंचायत प्रशासनाकडून वारंवार विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन केलेले असताना लॉकडाऊनचा शहरात पुरता बोजवारा उडाला आहे. किराणा, भाजीपाला, दूध आणि पाणी ,दवाखाने, मेडिकल स्टोअर यांच्यासाठीच सूट असताना आडत दुकाना सारखे प्रतिष्ठाने बिनदिक्कतपणे सुरू आहेत . ग्रामीण भागातून नागरिक दररोज हजारोंच्या संख्येने शहरात येत असून आपले दैनंदिन व्यवहार करीत आहेत शहरातील जवळपास सर्वच बँकेसमोर नागरिक गर्दी करताना दिसत आहेत .शहरातील नागरिक अत्यंत कमी प्रमाणात मास्कचा वापर करीत असून पोलीस प्रशासन नगरपंचायत प्रशासन अक्षरशः हतबल झाले आहेत फळ विक्रीच्या शेकडो हातगाड्या मुख्य रस्त्याने फिरत असून हात गाडी चालवणारे नाका तोंडाला कुठलाही रुमाल न बांधता स्वतः सुरक्षित राहत असून दुसऱ्याला सुद्धा धोक्यात घालत आहे. दररोज शेकडो नागरिक मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद येथून पायी चालत शहराच्या लगतच्या रस्त्याने आपापल्या गावाकडे जात आहेत त्यांची ना तपासणी ना विचारपूस अशी ढिलाई पोलीस प्रशासनाची दिसून येते विना पासेसची चार चाकी वाहने आणि टू व्हीलर वाहने बिनदिक्कतपणे पोलिसांसमोर धावत आहेत .सुरुवातीच्या काळात लॉकडाऊनची कडकपणे अंमलबजावणी करणारे आता नरमाईची भूमिका घेताना दिसत आहेत. लॉकडाऊनची ऐसी की तैसी करणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या दंडुके शिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .ग्रामीण भागातून शहरात ज्या वाहनाने रिक्षाने लोक मंठा शहरात येतात अशा वाहनावर सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे लॉक डाऊनचा फज्जा उडाला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक