Breaking News
जालना जिल्हापरतूर तालुका

परतूर तालुक्यातील खांडवी येथे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने” अंतर्गत मोफत तांदळाचे वाटप


परतूर न्यूज – परतूर तालुक्यातील मौजे खांडवी येथील स्वस्त धान्य दुकान क्र.114 च्या वतीने “प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने”अंतर्गत प्रति कार्ड धारक प्रति व्यक्ती 5 कीलो तांदूळ स्वस्त धान्य दुकानदार श्री रामधन पिराजी बरकुले व सहाय्यक विठ्ठल उत्तमराव बरकुले यांनी शासनाच्या आदेशाने तात्काळ मोफत तांदूळ वाटप केला.
या वेळी मोफत धान्य वाटप करताना गर्दी न होऊ देता सोशल डीस्टसिंग नुसार प्रत्येक व्यक्ती प्रमाणे 5 किलो तांदूळ वाटप केला आहे.सध्या देशात लॉकडाऊन चालू असून कुठेही गर्दी न करता सोशल डीस्टसिंग चा वापर करून तात्काळ धान्य वाटप करून गावात सर्वाना रेशन मिळेल या प्रमाणे सर्वानाच वाटप करण्यात आले, या वेळी सर्वाना मास्क वापरण्याच्या सूचना करण्यात येऊन धान्य वाटप करण्यात खबरदारी म्हणून मोठ्या लोखंडी पाईप द्वारे लाभार्थ्यांना 5 फुटाच्या अंतरावरून कुणाचाही हाथ न लागता धान्य वाटपाचा आगळा वेगळा प्रयोग दुकानदाराकडून राबवण्यात आला.
या वेळी गावातील दुकानदारासह तलाठी पी.व्ही. काकडे, ग्रामसेवक ए. के. चौधरी, पोलीस पाटील कान्होजी साळवे,ग्रामपंचायत शिपाई शेख सादिक,कोतवाल सुंदर जाधव, ग्रामपंचायत संगणक चालक संदीप साळवे,डॉ. प्रधान वआशा स्वयंसेविका रेणुका पराडे यांच्यासह गावातील प्रमुख नेते माजी जि.प.सदस्य सूर्यकांत बरकुले,सरपंच शारदा गणेश हारकळ,माजी सरपंच विष्णू बरकुले,उपसरपंच अंकुश बरकुले, मा. सरपंच भीमराव साळवे,योगेश बरकुले अंबादास साळवे, दत्ता बरकुले, संतोष साळवे व राजेभाऊ साबळे हे सोशल डिस्टसिंग नियमाचे तंतोतंत पालन करत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक