सामाजिक वनीकरणाचा सावळा गोंधळ, वनविभागाचा काना डोळा
मधुकर सहाने : भोकरदन
पाऊस पडला की वनविभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत उद्दिष्टाप्रमाणे रोपलागवडीचे काम सुरू केले जाते. रोपलागवड योग्य पाऊस पडल्यामूळे लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण भोकरदन यांनी सुद्धा लागवड सुरू केली परंतु रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड काम चालू असलेल्या ठिकाणी जाऊन स्वतः प्रत्यक्ष भेट दिली तर भोकरदन तालुक्यात शासनाने दिलेल्या नमुना अंदाजपत्रका नुसार एकही काम जाग्यावर प्रत्यक्षात नाही व खड्यांचा आकारही योग्य त्या मापदंडात नाही असे निदर्शनास आले आहे.
जसे की प्रथम वर्ष कामांमधील बाब क्र.१ :- (0.60 x 0.60 x 0.60) आकाराचे खड्डे मातीने भरणे. भरतेवेळी खड्डयात कंपोस्ट/शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट व आवश्यकतेनुसार लिंडेन बुरशीनाशके/किटकनाशके प्रत्येक खड्डयात टाकणे. असे न करताच रोपे लागवड करण्यात आली आहे. बाब क्र.३ नुसार रोपवाटिकेतून रोपे भरण्यासाठी मनुष्य दिवस उपलब्ध असून तरी तेदेखील रोजगार हमी योजनेअंतर्गत रोपवाटिकेत कामावर असलेल्या मजुरांकडून रोपे भरण्याचे काम करून घेतले गेले.रोप लागवड करतेवेळी रोप खड्ड्यात व्यवस्थित पणे लावून घेतले नाही. रोपांची हुंडी उघडाच आहे.