Breaking News
जालना जिल्हापरतूर तालुका

आष्टी मध्ये अनुदानासाठी नागरिक रस्त्यावर


सोशल डीसटन्स राखण्यासाठी बँके सोबत पोलीस प्रशानासनची होतेय धावपळ
उन्हात तासनतास तास नागरिकांना उभे राहण्याची आली वेळ
आष्टी प्रतिनिधी :- देशभरात कोरोना वायरसला रोखण्यासाठी 21 दिवसाचा लॉक डाऊन केला होता या मुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले त्या मुळे रोजंदारीवर तसेच मजूरी करणाऱ्या लोकांचे हाल होत असल्याने केंद्रा कडून मदत म्हणून महिलांच्या जनधन खात्यात 500 रुपये अनुदान टाकण्यात आले सोबतच विधवा ,दिव्यांग , ज्येष्ठ नागरिक पेन्शन ,पीएम किसान मानधन आदी योजनेच्या मानधनासाठी लॉक डाऊन असल्याने हाताला काम नसल्याने विविध योजनेचे मानधन काढण्यासाठी सध्या नागरिक रस्त्यावर येताना दिसत आहेत

परतुर तालुक्यातील आष्टी गावात बँक ऑफ महाराष्ट्र समोर अशी राग लागली आहे तर खातेदारांना उन्हात उभे राहून अनुदान रक्कम काढावी लागत आहे (छायाचित्र – जालना न्यूज प्रतिनिधी आष्टी)

बँके समोर रांगाच रांगाच लागत असुन बँक उघडण्या आगोदर नागरिक आपला नंबर लावून उभे राहात असुन भर उन्हात नागरिकांना आपला नंबर येण्याची वाट पहावी लागत असुन आपला नंबर येण्यासाठी तासाभराच्या वर प्रतीक्षा करावी लागत आहे आष्टीत राष्ट्रीयीकृत बॅंक ऑफ महाराष्ट्र व स्टेट बँक ऑफ इंडिया या दोन बँका असुन सध्या या बँके समोर व त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रावर मोठी गर्दी पहावयास मिळत असुन लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत असल्याने बँकेचे कर्मचारी, ग्राहक सेवा केंद्र चालक असो की पोलीस प्रशासन यांची मात्र सोशल डीसटन्स राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे उन्हाचा तडाखा पाहता या पासून बचावासाठी बँकेने उपाय योजना करण्याची गरज भासत आहे सोशल डीसटन्स राखण्यासाठी बँकेच्या वतीने ग्राहक सेवा केंद्र चालक सोबतच पोलीस यंत्रणा सोशल डीसटन्स राखण्यासाठी परिश्रम घेत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक