जालना जिल्हाभोकरदन तालुका

वालसावंगी येथील धामणा नदीतुन होतेय वाळू चोरी.

वालसावंगीन्युज (ता भोकरदन )

धामना नदीतील वाळूचोरी साठी अश्या प्रकारे वाळू चाळून ठेवली जाते.

-भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील धामणा या नदीतील काही रेती तस्कर रात्रीच्या वेळेला ट्र्याक्‍टरच्या साह्याने अवैध रेती चाळुन ट्रॅक्टरच्या साहाय्याने विक्री करीत आहे.
सध्या भारतभर लॉक डाऊन आहे व सर्व प्रशासन लोक डाऊनच्या कामात व्यस्त आहे याचाच फायदा घेत भोकरदन तालुक्यातील रेती तस्करांनी आपला मोर्चा बळकट करत रेती उपसा जोरात चालू केला आहे याच्या मागे कोणाचे पाठबळ आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे . या मध्ये विशेष बाब म्हणजे हे तस्कर नदी पात्रातच रेती चाळुन नंतर ट्र्याक्टरच्या माध्यमातन विक्री करत आहे येवढे होत असतांना महसूल चे दुर्लक्ष असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक