Breaking News
अंबड तालुकाजालना जिल्हाशेतीविषयक

उन्हाळ्यात लागणारे मातीचे माठ कोरोनामुळे कसे विकणार ;कुंभार कारागीर आर्थिक अडचणीत

शासनाने कुंभार कारागिरांना उदरनिर्वाहासाठी मदत करावी

वडीगोद्री न्यूज (तालुका अंबड):-
गरिबांचा फ्रीज म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात मातीपासून तयार केलेल्या माठ,रांजण व सूरईला मोठ्या प्रमाणात मागणी असते.कुंभार समाजाचा हा मोठा आर्थिक श्रोत असतो.मात्र गेल्या महिन्याभरापासून कोरोनामुळे हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे.

वडीगोद्री –
कोरोनामुळे कुंभार समाजातील कारागिरांची अवस्था खूपच वाईट झाली आहे.उन्हाळ्याच्या दिवसात मोठया प्रमाणात कुंभार समाजातील कारागिरांनी तयार केलेले माठ,रांजण,सुरई आणि इतरही मातीपासून तयार केलेल्या वस्तू तशाच पडून आहेत.अशीच परिस्थिती राहिली तर कुंभार समाज मोठ्या आर्थिक अडचणीत येणार आहे.त्यामुळे शासनाने या सर्व बाबींचा विचार करून कुंभार समाजास लवकरात लवकर आर्थिक मदत करावी.अन्यथा समाजावर उपासमारीची वेळ येणार आहे असे
डीगांबर साक्रुस्कर,माठ विक्रेता,अंतरवाली सराटी यांनी सांगितले

कुंभार बांधवांकडे रांजण,माठ,सुरई इतर मातीच्या वस्तू तयार आहेत.मात्र लॉक डाऊनमुळे कुंभार समाज आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
कोरोणाच्या आपत्तीने संपूर्ण उद्योग व्यवस्थापन कोलमडले आहे.गाव खेड्यातील छोटे उद्योगही बंद झाले.परंपरागत व्यवसाय करणारा कुंभार कारागीर वर्षभर मेहनत करून माठ बनवतो.कोरोणाच्या संकटाने मात्र बनवलेले माठ घरातच पडून राहिल्याने कुंभार कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे.चक्र फिरवत नवनिर्मिती करणाऱ्या या कारागिरांना कोरोणामुळे कालचक्र फिरल्याने ऐन हंगामात घरातच गप्प बसून राहण्याची वेळ आली आहे.
उन्हाची तीव्रता वाढू लागताच मार्च ते मे या महिन्यांमध्ये माठ,रांजण बाजारात विक्रीसाठी येत असतात. विक्रीतून जमा झालेल्या पुंजीवर संपूर्ण वर्षाचे गणित जुळवले जाते.परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने गावोगावचे बाजार बंद झाले आहेत.परिणामी विक्री नाही यामुळे कुंभार कारागीर यांच्यापुढे पोटाची खळगी भरायची कशी असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.लॉक डाऊन कधीपर्यंत चालेल व कधी बाजारपेठ खुली होईल याबाबत साशंकता असल्याने कुंभार कारागीर आर्थिक संकटात सापडला आहे.
कुंभार समाज हा अत्यंत कष्टकरी समाज म्हणून ओळखला जातो.कुंभारकाम या पारंपरिक व्यवसायातून प्राप्त उत्पन्न अत्यल्प असल्यामुळे कुंभार समाज आर्थिकदृष्ट्या मागे पडलेला दिसून येतो.कुंभार समाजाचा इतिहास वैभवशाली असला तरी सद्यस्थितीत हा समाज कष्टप्रद जीवन जगत आहे.त्यामुळे माल तयार असूनही लॉक डाऊनमुळे कुंभार व्यवसायिकांना विक्रीसाठी नेता येत नाही.त्यामुळे त्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
परंपरागत कला जपत माठ बनविण्याच्या व्यक्तिगत पोट भरण्याचे दुसरे साधन नसणाऱ्या कुंभार कारागिराकडे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे माठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य माती,उसाचा भूकठा,भाजण्यासाठी लागणारे इंधन याचा खर्चही अंगावर पडला आहे.शासनाने कुंभार कारागिरांना उदरनिर्वाहासाठी मदत करावी,अशी मागणी कुंभार कारागिर यांच्यामधून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक