Breaking News
घनसावंगी तालुका

राजणी परीसरात मेंढपाळ युवकाची आत्महत्याने खळबळ

घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
रांजणीन्यूज (ता घनसावंगी)
घनसावंगी तालुक्यातील रांजणी शिवारात गुरुवारी रात्री एका युवकाने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे तो युवक मेंढपाळ असल्याचे समोर आला आहे. यामुळे राजणी परिसरात एकच खळबळ उडाली.

राजणी न्यूज:- राजणी परीसरात मेंढपाळ ने आत्महत्या केली यावेळी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली व पंचनामा केला (छायाचित्र -असलम कुरेशी राजणी न्यूज)


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणी शिवारातील बंडू कुशाबा गाढे यांच्या गट क्रमांक 345 मधील शेतात गोलटगाव ता. जि. औरंगाबाद येथील मेंढपाळ युवक निलेश भाऊसाहेब राईद (वय 19 वर्षे) याने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच घनसावंगीचे पोलिस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर यांच्यासह पोलिस जमादार जी.जी. मदन, जमादार विनोद देशमाने, भागवत खरात यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी भारत भीका मिसाळ (रा.दिमणी वाहेगाव ता.जि. औरंगाबाद) यांच्या फिर्यादीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस जमादार जी.जी. मदन करीत आहे. यावेळी अमोल देशमुख, भगवान इंगळे, प्रीतम वरखडे, धनंजय देशमुख, बंडू गाढे, राधाकिसन शिंगणे, भारत देवकर आदींनी पोलिस व मयताच्या कुटुंबांस सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक