Breaking News
शेतीविषयक

गरिबांचे फ्रीज चे निर्मातेच अडचणीत

कुटुंबाचा खर्च सोसावा कसा यां काळजी ने अडचणीत

पिंपळगाव रेणुकाई न्यूज

कुंभार समाजाचा इतिहास वैभवशाली असला तरी सद्यस्थितीत हा समाज कष्टप्रत जीवन जगत असल्याचे दिसून येते, त्यामध्ये या लॉकडाउनमुळे त्यांच्या समस्या अधिक वाढल्या आहेत
ग्रामीण भागातील कुंभार समाजाकडून तयार केल्या जाणाऱ्या माठ सह इतर अनेक वस्तूंना ग्राहकांची मोठी मागणी असते परंतु कोरोणामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. तयार केलेल्या माठ आणि इतर वस्तू घरातच पडून असल्यामुळे कुंभार समाजाची आर्थिक घडी कोलमडली असून, त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोना विषाणूमुळे लागू असलेल्या लॉकडाउनमुळे अनेक व्यवसायांना फटका बसला आहे. त्याचप्रमाणे परिसरातील गावा-गावातील कुंभार समाजाच्या व्यावसायिकांनाही त्याच्या झळा बसल्या आहे. परंपरागत व्यवसाय करणारा कुंभार समाजातील कारागीर वर्षभर मेहनत करून मातीच्या विविध वस्तु बनवतो. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात तयार केलेले माठ, रांजण हे उन्हाळ्यामध्ये विकले जातात. परंतु माठ, रांजण विकण्याच्या कालावधीतच कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि शासनाने लॉकडाउन लागू केले.

जानेवारीपासूनच आम्ही उन्हाळ्यासाठी लागणारी माठ, रांजण याशिवाय अनेक वस्तू तयार करण्यासाठी लागलेलो आहे. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता ग्राहक येत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर कमी होऊन लॉकडाउन उघडेल अशी अपेक्षा होती, परंतु आता लॉकडाउन अजून वाढले, ऐत्यामुळे बनवलेला माल विकावा कसा असा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे.असे दिलीप सिल्लोडे यांनी सांगितले
(छायाचित्र- जालना न्यूज रेणुकाई पिंपळगाव प्रतिनिधी)

परिणामी कुंभार समाजातील बांधवांनी तयार केलेले माठ, रांजण आणि इतर मातीच्या वस्तू आता घरातच पडून आहे. खरेदीसाठी ग्राहक फिरकत नसल्याने हजारो रुपयांची गुंतवणूक होऊन पडली आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा ? कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आता लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढल्यामुळे त्यांच्या अडचणीत अजून भर पडली आहे. कुंभार समाज हा अत्यंत कष्टकरी समाज म्हणून ओळखला जातो. कुंभारकाम या पारंपरिक व्यवसायातून मिळणारे उत्पन्न अत्यल्प असल्यामुळे कुंभार समाज आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे आढळून येते.

जानेवारीपासूनच आम्ही उन्हाळ्यासाठी लागणारी माठ, रांजण याशिवाय अनेक वस्तू तयार करण्यासाठी लागलेलो आहे. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता ग्राहक येत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर कमी होऊन लॉकडाउन उघडेल अशी अपेक्षा होती, परंतु आता लॉकडाउन अजून वाढले, ऐत्यामुळे बनवलेला माल विकावा कसा असा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक