जालना:अडीचशे वर्षांची परंपरा खंडित; आनंदी स्वामी यात्रेवर कोरोनाचे सावट
जालना न्यूज
जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने राज्यभरातील अनेक धार्मिक उत्सवावर विरजण टाकलंय. जालना शहरातील छोटे पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या आनंदी स्वामी महाराजांच्या यात्रेवर यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे अडीचशे वर्षापासूनची परंपरा खंडित झाली आहे.
दरवर्षी आनंदी स्वामी महाराज मंदिर परिसरात आषाढी एकादशीनिमित्त यात्रा भरते. त्यामुळे यात्रेकरूंची लगबग असते. परंतु यावर्षी कोरोनामुळे घातलेल्या निर्बंधांमुळे येथील रस्त्यावरती शुकशुकाट पाहायला मिळतो.
मागच्या वर्षीही कोरोनाच्या निर्बंधांमुळे यात्रा झाली नव्हती. तर मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत पालखी निघाली होती. यंदाही कोरोनाचे सावट असल्याने शासनाने घालून दिलेल्या निर्बंधातच सर्व उत्सव साजरा केला जाणार आहे.
किमान सायंकाळी सात वाजेपर्यंत दर्शनाला परवानगी देण्याची मागणी मंदिराच्या ट्रस्टी कडून करण्यात येत आहे. सध्या मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत दैनंदिन उत्सव साजरा केला जात आहे. असं असलं तरी यंदा हा उत्सव कोरोनाच्या सावटाखाली आहे. त्यामुळे अनेक भक्तांच्या वाट्याला निराशा आलेली आहे.