जालना जिल्हाबदनापूर तालुका

बदनापूर येथे सार्वजनिक ठिकाणी हॅन्डवॉशची व्यवस्था

बदनापूर नगरपंचात कार्यालसमोर हॅन्डवॉश स्टेशन सुरू करण्यात आले आहे


बदनापूर, तालुका (न्यूज) : कोरोना पार्श्वभूमीवर बदनापूर शहरातील नगरपंचायत भागात हॅन्ड वॉश स्टँड सुरू करण्यात आला असून आणखी चार ठिकाणी असे स्टँड उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे आणि स्वच्छता विभागाचे अभियंता गणेश ठुबे यांनी न्यूज जालना शी बोलताना दिली.
देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने बदनापूर नगरपंचायत शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत आणखी दक्ष झाले आहे. दररोज शहरात प्रत्येक प्रभागात स्वच्छतेची कामे करण्यात येत आहे. शहरात निर्जंतुकीकरण आणि धूर फवारणीही केली जात आहे. आता लॉकडाऊनच्या काळात काम करणाऱ्या यंत्रणेतील कर्मचारी आणि अत्यावश्यक कामांसाठी बाहेर फिरणाऱ्या लोकांना हाथ निर्जंतुक करण्यासाठी शहरातील पाच ठिकाणी हॅन्डवॉश सेंटर उभारण्यात येत आहे. त्याची सुरवात बदनापूर नगरपंचायत कार्यालयासमोरील महामार्गावर करण्यात आली. यासाठी वॉशबेसिन, डेटॉल हॅन्डवॉश आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वारंवार हाथ धुवा असा संदेश देत नगरपंचायत प्रशासनाने हाथ कसे धुवावे याची माहितीही हॅन्डवॉश सेंटरवर लिहून ठेवली आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नगरपंचायत करीत असलेल्या उपाययोजनांचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक