Breaking News
घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

दुधनाचे पाणी खाली सोडल्यास पाच गावाची तहान भागणार

दुधना नदीचे पाणी कवठ्यापर्य॔त सोडल्यास अनेक गावांची तहान भागणार
रांजणी न्यूज ता घनसावंगी
रांजणीपासून जवळ असलेल्या कवठा येथील दुधना नदीच्या पात्रात चित्रवडगावच्या कट्यातून पाणी सोडण्याची मागणी होत आहे. येथे पाणी सोडल्यास 5 गावांची तहान भागनार आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की घनसावंगी व जालना तालुक्यात पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला तर रांजणी पासून जवळच असलेल्या दुधना नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होतो. यामुळे परिसरातील अनेक गावांची पाणीटंचाई मिटण्याची शक्यता असते. परंतु मागील वर्षी घनसावंगी व जालना तालुक्यात सरासरी पेक्षाही कमी पाऊस झाला. ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे कवठा येथील दुधना नदीच्या पात्रात पाणी अडवण्यात आले होते. त्यामुळे कठड्याजवळील दुधना नदीच्या पात्रात जानेवारी महिन्यापर्यंत जलसाठा उपलब्ध होता. परंतु सध्या येथे पाणीसाठा शिल्लक नसल्याने दुधना नदी कोरडी पडली असून यामुळे नदी पात्रातून वाळू उपसा सुरु आहे. रांजणीपासून जवळ असलेल्या चित्रवडगाव येथील कट्टयावर दुधना नदीचे पाणी अडवण्यात आलेले आहे. त्यामुळे चित्रवडगाव व करडगाव जवळील नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साठा उपलब्ध आहे. हा पाणी साठा कवठ्यापर्यंत सोडल्यास वझर, रांजणीवाडी, रांजणी, कवठा व बाबई या 5 गावातील नागरिकांची पाणीटंचाईतून सुटका होऊ शकते. सध्या कवठा व रांजणीवाडी जवळच्या नदी पात्रात पाणी नसल्याने येथून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे. त्यामुळे चित्रवडगाव येथील कट्टा खोलून हे पाणी कवठ्यापर्य॔त सोडल्यास अनेक गावांची तहान भागू शकते. कारण पाणीटंचाईमुळे लाॅकडाऊन असूनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या रांजणी येथील नागरिक खाजगी टँकरचे पाणी विकत घेऊन तहान भागवित आहेत. परंतु प्रशासनाने पेट्रोल व डिझेल बंद केल्याने खाजगी टँकरही बंद होण्याच्या मार्गावर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक