परतूर तालुका
डाँ. आण्णाभाऊ साठे यांना परतूरात आभिवादन
दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क लोकशाहीर ,साहित्यसम्राट ,डाँ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त परतूर येथील अण्णाभाऊ साठे समाज मंदिर ,साठे नगर येथे अभिवादन करण्यात आले. यात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले डाँ.अण्णाभाऊ साठे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा फुले यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक बाबुराव हिवाळे ,पत्रकार दीपक हिवाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नानाभाऊ कासारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश हिवाळे, देवराव हिवाळे, अशोक दशरथ हिवाळे ,लक्ष्मण साठे, प्रकाश गायकवाड, गणेश गायकवाड, अरुण गायकवाड व किशोर धोञे उपस्थित होते.