घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

घनसावंगी तालुक्यात डिझेल अभावी शेतीची कामे खोळंबली


रांजणी न्यूज/असलम कुरेशी
प्रशासनाने नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जमावबंदी आदेश लागू करुन पेट्रोल व डिझेल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र डिझेल अभावी ग्रामीण भागातील सर्व ट्रॅक्टर उभे असल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत.
सध्या कोरोना व्हायरसमुळे शासनाने लाॅकडाऊनची घोषणा करुन जमावबंदी आदेश लागू केलेला आहे. बाजारपेठ बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग शेतीच्या कामात व्यस्त होण्याची शक्यता होती. सध्या शेतातील गहू, ज्वारी व हरभरा पिकांची काढणी सुरु आहे. तसेच शेती नांगरणीचे काम सुरु होते. परंतु प्रशासनाने पेट्रोल व डिझेल बंद केल्याने शेतीची सर्वच कामे खोळंबली आहेत. रांजणी परिसरात शेकडो ट्रॅक्टर शेतीची कामे करतात. ट्रॅक्टरने लवकर कामे होत असल्याने शेतकरी वर्गात समाधान असतो. तसेच दररोज शेतीची कामे असल्याने ट्रॅक्टर चालकांना उत्पन्न प्राप्त होते. परंतु डिझेल अभावी सर्व ट्रॅक्टर उभे असून शेतीची कामे खोळंबली आहेत. यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. तसेच शेतीची कामे बंद असल्याने उत्पन्न होत नाही. त्यामुळे ट्रॅक्टरचे हप्ते कुठून भरावे असा प्रश्न ट्रॅक्टर चालकांना पडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक