Breaking News
घनसावंगी तालुका

रांजणीच्या मध्यवर्ती बँकेत सोशल डिस्टन्सचा बोजवारा


रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सध्या अतिवृष्टीचे पैसे वाटप करण्यात येत असून यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा मात्र बोजवारा उडत असल्याचे दिसत आहे.
रांजणी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत परिसरातील जवळपास 22 गावातील नागरिकांचे खाते असून येथे पैशासाठी शेकडो नागरिक येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाॅकडाऊनची घोषणा केल्यानंतर येथे काही दिवस अजिबात गर्दी दिसत नव्हती. परंतु मागील दोन दिवसापासून येथे अतिवृष्टीचे पैसे वाटप होत असल्याने पैसे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. येथील बँकेत 22 गावातील शेतक-यांचे अनुदान जमा झाले होते. त्यापैकी 21 गावातील शेतक-यांचे पैसे वाटप करण्यात आले. परंतु पैसे वाटप करताना बँकेच्या कर्मचा-यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारण येथे दररोज 100 ते 150 शेतकरी पैसे काढण्यासाठी येत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे मात्र तीन तेरा वाजत असल्याचे दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक