जालना जिल्हाबदनापूर तालुका

औरंगाबाद चे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वाहनात आढळले साडेसहा लाख रोख व दारूच्या बाटल्या.

बदनापूर न्यूज :- जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनात चक्क दारूच्या बॉटल्या व 6 लक्ष 70 हजार रुपये आढळून आल्याने खळबळ उडाली असून सदरील प्रकरणी बदनापूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे

बदनापूर :- ह्या चार चाकीत मुद्देमाल सापडला आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी असल्यामुळे बदनापूरपासून जवळच असलेल्या नूर हॉस्पिटलसमोर असलेल्या चेक पोस्टवर औरंगाबादचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनात चक्क दारूच्या बॉटल्या व 6 लक्ष 70 हजार रुपये आढळून आल्याने खळबळ उडाली असून सदरील प्रकरणी बदनापूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.शासनाचे मुख्यलाय सोडू नये असे आदेश असतांना देखील सदर अधिकारी मुख्यलाय सोडून जालना जिल्हयात मिळून आला आहे
कोरोना रोगाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी सध्या जिल्हा बंदी आहे. यासाठी जालना ते औरंगाबाद या महामार्गावर बदनापूरपासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या वरूडी येथील नूर हॉस्पिटलसमोर चेक पोस्ट तयार करण्यात आलेले असून या ठिकाणी जालना पोलिस व औरंगाबाद पोलिसांचे दोन्ही बाजूनी चेक पोस्ट आहे. औरंगाबादकडे जाणारी वाहने औरंगाबाद पोलिस तपासतात तर जालनाकडे येणारी वाहनांची तपासणी जालना पोलिस करत असतात या ठिकाणी तपासणी करत असताना संचारबंदीतून सूट असलेल्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाच जाऊ दिले जाते नसता ते वाहन परत पाठवले जाते. या परिस्थितीत औरंगाबाद येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते यांचे शासकीय वाहन आज औरंगाबाद कडून जालनाकडे जात असताना जालना पेालिसांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सदर वाहन तपासणी केली असता इरटिगा क्रमांक एमएच 20 सीयू 0353 या वाहनाच्या समोरील काचेवर औरंगाबाद शहर पोलिसांनी संचारबंदी दरम्यान दिलेला परवाना लावलेला असून त्यावर आरोग्य विभाग अत्यावश्यक सेवा, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद असे प्रिंट करून लावलेले आहे. या प्रिंटवर भारत सरकारची मुद्रा तसेच आरोग्य विभागाचा लोगो असून या वाहनाच्या पुढील व मागील दर्शनी भागात महारार्ष्ट शासन असे लिहिलेले आहे. हे वाहन औरंगाबाद कडून जालनाकडे जात असताना वरूडी येथील चेक पोस्टवर जालना जिल्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक‍ शिवसिंग बहुरे, वाहन निरीक्षक शरद टेरटे, आरोग्य विभागाचे एस. एन. महेश्वर, ए. एन. गोरवाडकर,जी. एस. चव्हाण, पी. पी. साळवे,उदय सिंग जारवाल, राठोड, शेख इरफान, दत्ता पवार, पाराजी बोरुडे , दांडगे, आदींचे पथक कार्यरत होते. या पथकाने या वाहनाची तपासणी केली असता या वाहनात दारूच्या बॉटल व काही रक्कम आढळून आल्यामुळे या पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक बहुरे यांनी हे वाहन बदनापूर येथील पोलिस ठाण्यात आणून पंचनामा केला असता या वाहनात विदेशी दारूच्या मोठया २ बॉटल व 6 लक्ष रुपये आढळून आले.
या वाहनात जिल्हा परिषद औरंगाबादचे जिल्हा आरेाग्य अधिकारी डॉ. अमोल गीते हे प्रवास करत होते. या बाबत पोलिस उपनिरीक्षक शिवसिंग सुप्पडसिंग बहुरे यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, पथकासह वरूडी येथील चेक पोस्टवर कार्यरत असताना गुप्त बातमीदारांकडून बातमी मिळाली होती की इर्टिका कार क्रमांक एम एच 20 सीयू 0353 या वाहनामध्ये हवालाची मोठी रक्कम औरंगाबादहून जालन्याकडे जात आहे. ही बातमी मिळताच सतर्कपणे चेकपोस्ट येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत होती. यावेळी हे वाहन आले असता या वाहनाचा चालक हिरालाल आसाराम शेवजळ यांनी सांगितले की, ही कार महारार्ष्ट शासनाच्या मालकीची असून कारमध्ये बसलेले डॉ. अमोल रामभाऊ गिते , वैद्यकीय अधिकारी,संभाजीनगर यांच्या सांगण्यावरून कार चालवित घेऊन आलो आहे, सदरील वाहनाची झडती घेतली असता दोन विदेशी दारूचे मोठया बाटलया व काळया रंगाच्या बॅगमध्ये रोख 6 लाख 70 हजार रुपये मिळून आले. यावेळी 6 लक्ष रुपये किंमतीचे महाराष्ट्र शासन लिहिलेले आहे असे वाहन 6000 रुपये किंमतीचा एका काळया रंगाच्या बॅगमध्ये व्हॅट 69 कंपनीच्या दोन सिलबंद बाटल्या, व 2000 रुपये किंमतीच्या 275 चलनी नोटा, 500 रुपये 240 नोटा असे रोख 670000 रुपये असे एकूण 12 लक्ष 76 हजार रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला असून आरोपी डॉ अमोल गीते विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक