Breaking News
घनसावंगी तालुका

२९ गावचा भार एकच वैद्यकीय अधिका-यावर..


रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका वैद्यकीय अधिका-याची जागा रिक्त असून 29 गावांतील 45 हजार नागरिकांच्या आरोग्यसाठी फक्त एक वैद्यकीय अधिकारी असल्याने त्यांना तारेवरची कसरत लागत आहे. त्यामुळे येथे आणखी एका वैद्यकीय अधिका-याची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.
रांजणी येथे शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्र अंतर्गत 6 उपकेंद्रे येतात. त्यामुळे येथे उपचारासाठी नेहमीच रुग्णांची गर्दी असते. शासनाच्या वतीने रुग्णांच्या सेवेसाठी येथे दोन वैद्यकीय अधिका-यांची पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. परंतु येथील एक वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सहाय्यकाची बदली झाल्यामुळे 29 गावांतील सुमारे 45 हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याची अयशस्वी कसरत एका वैद्यकीय अधिका-याला करावी लागत आहे. तसेच 6 उपकेंद्रांना भेट देण्यासाठी आणि शासकीय बैठकांना उपस्थित राहण्याची जबाबदारी एका वैद्यकीय अधिका-याला पार पाडावी लागत आहे. सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसची चर्चा असून दुर्दैवाने हा व्हायरस रांजणी परिसरात आला तर नागरिकांचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही. कारण एका वैद्यकीय अधिका-याला शासकीय बैठक व प्रशिक्षणाला जावे लागते. अशा वेळी एखादा रुग्ण उपचारासाठी आला तर त्याचे नातेवाईक सरळसरळ वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याची तक्रार करतात. कारण वैद्यकीय अधिकारी शासकीय बैठकीला गेल्याचे कुणीच मान्य करत नाही. विशेष म्हणजे येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ.विशाल ठाकुर कधीच गैरहजर राहत नाही. येथील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सहाय्यकाचे पद रिक्त असूनही आता पर्यंत कोणत्याही कार्यकर्त्यांनी हे पद भरण्याची लेखी मागणी केलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक