धार्मिक

नमाज व इफ्तारसाठी मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊ नये


रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी
कोरोना व्हायरसचा संसर्ग व संक्रमण टाळण्यासाठी मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्यात सामूहिक नमाज व इफ्तारसाठी एकत्रित येऊ नये, अशा सूचना अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालयाच्या करण्यात आल्या आहेत.
या संदर्भात अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालयाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरसचा प्रसार होत आहे. यायासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 14 मार्च 2020 पासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक व क्रिडाविषयक कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. येत्या काही दिवसांत मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरु होत आहे. सध्याची परिस्थिती पाहता अधिक नागरिक एकत्रित आल्यास कोरोना व्हायरसचा संसर्ग व संक्रमण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रमजान महिन्याच्या अनुषंगाने शासनाच्या वतीने काही सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार लाॅकडाऊनच्या काळात ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत, त्याचे पालन रमजान महिन्यातही कटाक्षाने करावे. कोणत्याही परिस्थितीत मशिदमध्ये नियमित नमाज पठन, तराविह व इफ्तारसाठी एकत्र येऊ नये. घराच्या व इमारतीच्या छतावर नमाज पठन श इफ्तारसाठी एकत्रित येऊ नये. मोकळ्या मैदानावर नमाज व इफ्तारसाठी एकत्रित येऊ नये. कोणताही सामाजिक, धार्मिक व कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे, याची नोंद घ्यावी. सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांच्या घरात नियमित नमाज पठन, तराविह व इफ्तार आदी धार्मिक कार्यक्रम पार पाडावे. लाॅकडाऊन विषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. या सूचनांचे पालन करण्यासाठी मुस्लिम समाजाचे धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्था यांच्या मार्फत जनजागृती करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक