अंबड तालुका

गोदी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध संचारबंदी उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल

संचारबंदी आदेशाचे उल्लंघन
■ दोन जणाविरूध्द गुन्हा
■ वाळकेश्वर येथील घटना

शहागड न्यूज : अबंड तालुक्यातील वाळकेश्वर येथे
आदेशाचे उल्लंघन करून कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव होत असताना विना मास्कचे सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्यामुळे वाळकेश्वर च्या दोन जणाविरूध्द गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूंच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी लाॅकडाऊन जाहीर होताच जिल्ह्यात संचारबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे घर सोडून गल्लीबोळांमधे, मुख्य रस्त्यावर, महामार्गावर कुठेही नागरिक आढळून आल्यास त्यांच्या विरुद्ध संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे. अशात शनिवारी दुपारी वाळकेश्वर च्या मुख्य रस्त्यावर समीर बागवान, व जावेद बागवान हे दोन जण मास्क न लावता रस्त्यावर फिरत असल्याचे गस्तवर असलेल्या उपनिरीक्षक हनुमंत वारे व पथकाच्या निदर्शनास आले. मास्क न लावल्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रसारास खतपाणी मिळू शकते, तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी समीर बागवान, व जावेद बागवान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक