जालना जिल्हा

जालना शहरात निर्जंतुकीकरण मोहीम

जालना ( प्रतिनिधी न्यूज ) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नगर पालिकेच्या वतीने जालना शहरात वेगवान रितीने निर्जंतुकीकरण मोहीम राबविली जात आहे. रविवारी ( ता. १९) कोरोना विलगीकरण कक्षासह अधिकारी निवासस्थाने व शासकीय कार्यालये परिसरात सॅनिटाइजर फवारणी करण्यात आली

जालना शहरात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्यानंतर नगर पालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीमे सोबत विविध भागांत निर्जंतुकीकरण मोहीम हाती घेतली आहे. मुख्याधिकारी नितीन नार्वेकर हे स्वतः या मोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. स्वच्छता अधिक्षक संजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक अरूण वानखेडे, दफेदार श्रावण सराटे, फायर ब्रिगेड चे अधिक्षक विठ्ठल गोगरूड ,संतोष धोञे व सहकारी यांनी आज जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा व सञ न्यायाधीश, यांची निवासस्थाने,जिल्हा कचेरी, जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरातील विलगीकरण कक्ष, कोरोना रूग्णालय, परिसरात सोडीयम हायड्रो क्लोरीक ची फवारणी केली. तथापि नवीन जालना भागात स्वच्छता निरिक्षक खर्डेकर व सहकार्यांनी गांधी नगर, ढोरपुरा, सुवर्णकार नगर, भिम नगर परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी केली. या मोहिमेत संदीप दराडे, नितेश ढाकणे, पंजाब देशमुख, दीपक कारके यांनी पार पाडली असून वेगवान पध्दतीने मोहीम सुरू राहील असे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी सांगितले.

निर्जंतुकीकरण मोहीम…! नगर पालिकेच्या वतीने कोरोना विलगीकरण कक्ष परिसरासह शहरात निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली. फवारणी करतांना स्वच्छता निरिक्षक अरूण वानखेडे, विठ्ठल गोगरूड, श्रावण सराटे, आदी दिसत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक