भोकरदन तालुका

वाढोणा येथील वनपरिसराला आग लागूनही वनविभाग अनभिज्ञ


गवत वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर

वन विभागाचा अद्याप पर्यंत पंचनामा नाही नागरिकांची तक्रार

धावडा प्रतिनिधी न्यूज

भोकरदन तालुक्यातील वाढोना या जंगलात अज्ञात व्यक्तीने आग लावून दिली या आगीत वनविभागातील अनेक हिरवळ असलेले झाडे सुद्धा जळाली आहेत याबाबत वनविभागाला माहिती व तक्रार दिली असतानाही वनविभागाने पंचनामा सुद्धा केला नाही यावरून वनविभाग कधी गांभीर्याने काम करत असल्याचे दिसून येत आहे तर आग लागूनही वनविभाग अनभिज्ञ आहे हे मात्र विशेष.!

वाढोना येथील खाजगी व सरकारी जंगला ला आग लागल्याची दि 13/04/2020 रोजी वाढोणा व जाळीचादेव आदी ठिकाणी गवत व वनसंपदा नष्ट करण्यात आल्याची तक्रार वाढोणा येथील शेतकरी तथा सुरेश डोभाळ (रा वाढोणा ता . भोकरदन ) यांनी वनसंरक्षण विभाग औरंगाबाद जालना , भोकरदन व इतर आठ ठिकाणी तक्रार केली आहे
अधिक माहिती अशी की जवळपास चार ते पाच वर्षापासून या जंगला ला अज्ञात व्यक्तीच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने या जंगला ला दरवर्षी आग लावण्यात येते व या वर्ष 2020 जंगला ला आग लागल्याची खबर मिळाली ही आग दुपारी दिवसाढवळ्या अज्ञात व्यक्तीने लावल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे याबाबत वनविभागाला तक्रार देऊनही उपयोग होत नसल्याचे ग्रामस्थाचे म्हणणे आहे. तक्रार देऊनही वनविभागाने या ठिकाणी साधापंचनामा ही केला नाही तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामा करावा व अज्ञात oयक्तीविरूध्दात चौकशी करून . त्यांच्यावर कडक कारवाई करावी व वनसंपदा वाचवावी अशी मागणी होत आहे.
तथा जालना औरंगाबाद वनविभागाच्या कार्योलय समोर उपोषनचा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर शेतकरी सुरेश डोभाळ प्राचार्य गणेश इंगळे ,राजेश घुनावत,रोहीदास चिकटें, व जवळपास बारा ते पंधरा नागरिकांच्च्या या तक्रारीत सह्या आहे

भोकदन – आग लागल्यानंतर जंगल असे उजाड दिसत आहे तर वनविभागाणे मात्र साधा पंचनामा सुद्धा केला नाही

वनाधिकारी पवार काय म्हणल्यात:-

याच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की याबाबत सदर्भित अधिकारी यांना सांगुन तातडीने पंचनामा करण्यास सांगितले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक