घनसावंगी तालुका

पेट्रोल भरणे पडले महागात ;सोळा दुचाकी केल्या जप्त

सोळा दुचाकी पेट्रोल भरताना पकडल्यात गोंदी पोलिसांची कारवाई

अकबर शेख शहागड

तिर्थपुरी न्यूज :-घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथील पेट्रोल पंप वर विनाकारण अत्यावश्यक पास नसताना फीरणाऱ्या सोळा दुचाकीवर पोलिसांनी कारवाई करून मोटर सायकल ताब्यात घेतल्या आणि परिसरातील एकच खळबळ उडाली

मागील काही दिवसांपासून पेट्रोलपपं मालक व ग्राहकांत पेट्रोल भरण्यासाठी हमरी तुमरी होत होत्या.कुठलिही अत्यावश्यक पास नसतानाही अतिरिक्त पेट्रोल ची मागणी करत होते याच कारणामुळे ग्राहक व पेट्रोल पंप मालकात खटके उडत होते.पेट्रोल भरण्यासाठी आलेले असंख्य जणांकडे कुठलीही पास नसताना अतिरिक्त पेट्रोल साठी मागणी करत आहेत याची दखल रविवारी घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथे पोलिस उपनिरीक्षक नागरगोजे यांनी घेऊन अचानक सोळा दुचाकीवर कारवाई केली यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी-शहागड रोडवरील पेट्रोल पंपावर रविवारी दुपारी गोंदी पोलीसांना गर्दी दिसून येताच अत्यावश्यक सेवेत असनारे लोकांनाच पेट्रोल देण्यात यावे याकरिता मा. जिल्हाधिकारी यांचे असताना सदर वाहन चालक तिर्थपुरी येथील शहागड रोडवरील पेट्रोलपंपावर कसलाही कुठल्याही अत्यावश्यक सेवेत नसताना पेट्रोलकरिता गर्दी केलेली दिसून आले पोलिसांनी याबाबत अत्यावश्यक पास ची मागणी केली असता दुचाकी स्वराने आपले वाहन सोडून पळून गेले.या केलेल्या कार्यवाहीत सोळा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या सदर्भित दुचाकी ह्या पोलिस स्टेशन गोंदी येथे लावण्यात आल्या आहेत.ही कार्यवाही तिर्थपुरी चे पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे यांनी केली.

तिर्थपुरी:-विना अत्यावश्यक पास नसताना पेट्रोल पंप सह भागातील दुचाकी जप्त करण्यात आल्या फोटोत पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे व जप्त केलेल्या दुचाकी ट्रॅक्टरच्या साह्याने भरून पोलीस ठाण्यात नेण्यात आले

भागवत नागरगोजे पोलीस उपनिरीक्षक तिर्थपुरी

कुठलेही काम नसताना घराबाहेर पडणे व संचारबंदी न पाळणे यासाठी अनेकवेळा सांगुन ही विना अत्यावश्यक पास नसताना फिरत असलेल्या सोळा दुचाकी वर रविवारी कारवाई करण्यात आली आहे यात पूर्ण माहिती घेऊन येत्या काळात दुचाकी मालकांवरहीं गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

जालन्यातही बाटलीत पेट्रोल घेणे पडले महागात:-कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदीबरोबरच आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे अत्यावश्यक घटकात असलेल्या नागरिकांना अधिकृत पास असेल, तरच पेट्रोल द्यावेत, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. मात्र तरीही शहराबाहेरील काही पेट्रोल पंपावर बॉटलमध्ये पेट्रोल देण्यात येत होते. याप्रकरणी पेट्रोल पंपमालकासह कामगार आणि दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेरोजलाला तांबोळी असे त्या पंपचालकाचे, तर कामगार शेख शाहरुख आणि दुचाकीस्वार करण विलास निकाळजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक