जालना जिल्हा

गुंडेवाडीत एकही संशयित नाही,जालनेकराना दिलासा

गुंडेवाडीत एकही संशयित नाही,जालनेकराना दिलासा
जालना न्यूज :-
जालना तालुक्यातील गुंडेवाडी येथून 14 एप्रिल रोजी गुजरात येथे पोहचलेल्या महिलेला तेथे करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी अंती कोरोना आजार जडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा प्रशासनासह नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. गुजरात येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आलेल्या महिलेच्या गुंडेवाडी येथे वास्तव्यास असलेल्या पतीसह त्यांच्या संपर्कात आलेल्या 16 जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर सरकारी यंत्रणेतील अधिकारी,कर्मचाऱ्यासह जिल्ह्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या महिलेच्या पतीसह एकून 16 जणांना जिल्हा सरकारी रुग्णालयात विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या सहा पथकाद्वारे गुंडेवाडी येथील 261 कुटुंबातील 1632 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यात एकही व्यक्ती संशयित रुग्ण आढळून आला नसल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. दुःखी नगर भागात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या 65 वर्षीय महिलेची प्रकृती अद्याप गंभीर असून न्यूमोनिया व मधुमेहाच्या आजारामुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेली 55 वर्षीय महिला तसेच फुफसाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या 62 वर्षीय महिला अशा तिन्ही महिलांची प्रकृती गंभीर असून कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या महिले व्यतिरिक्त प्रकृती गंभीर असलेल्या अन्य दोन महिलांचे प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आलेले कोरोना चाचणीचे नमुने निगेटिव्ह प्राप्त झाले असल्याचे डॉ.राठोड यांनी सांगितले. दरम्यान, काल शनिवारी न्यूमोनिया आजारामुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका 34 वर्षीय तरुणाची प्रकृती देखील गंभीरच असून त्याचे नमुनेही प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले आहेत. गुंडेवाडी येथील 16 जणांचे प्राप्त झालेले निगेटिव्ह अहवाल आणि गावात आरोग्य पथकामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एकही संशयित रुग्ण आढळून न आल्यामुळे सरकारी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह जिल्हा वासीयांचा जीव भांड्यात पडला आहे आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक