शेतीविषयक

रोजगार हमीचे कामे सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


रामनगर / बबनराव वाघ
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे कामे गावागावात सुरू करवी आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोफत बियाण्याचे वाटप करावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्र्यांनाकडे एका इमेलद्वारे रामनगर येथील पुष्कराज तायडे यांनी केली आहे
जनतेने आपले आव्हान स्वीकारून कोविड १९ या महामारीच्या सर्व व्यवस्थेमध्ये लोकांनी सक्रिय सहभाग घेतला आहे आपणही सक्रिय महाराष्ट्राचे पालक म्हणून कार्य करीत आहात याचा आम्हाला अभिमान वाटतो . सध्या शेतकर्यांची होणारी हालअपेष्टा पहावत नाही उन्हाळ्यात पिकलेला भाजिपाला ई. पीके वाया गेली आहेत. जे गावात मजुर आहेत त्याना गावात रोजगार मिळत नाही. मजुराचे हाल होत आहेत.निव्वळ मजुरीवरती असणारी मजुरांची पोटं आता उपाशी मरायला लागली आहेत. साखर कारखान्यावरून आलेले मजूर यांना सध्या दोन हाताला काम मिळने अत्यंत गरजेचे आहे. शेतकऱ्यांचेही हाल होत आहेत. उपासमारीची वेळ आता लोकांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे ताबडतोब रोजगार हमिची कामे गावागावात सुरू करावित अशी मागणी करण्यात आली आहे आपल्याकडून जून २०२० ला जेव्हा पेरण्या सुरू होतील तेवा मोफत बियाण्याची सोय करण्यात यावी यातुन शेतकऱ्यांना आपली मदत होईल आणि उत्पन्न घेणे सोईचे अशी मागणी पत्रात केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक