जालना जिल्हाजालना तालुकाशेतीविषयक

व्यापा-याच्या प्रतीक्षेत मोसंबीच्या फळबागा


रामनगर न्यूज / बबनराव वाघ
जालना तालुक्यातील रामनगर व परीसरातील मोसंबीच्या बागा व्यापा-याच्या प्रतीक्षेत उन्हात तळत आहे व शेतकरी दिवाळखोरीत निघत आहेत.

_रामनगर -परिसरात अश्या प्रकारे मोसंबी चे लॉकडाऊन मुळे नुकसान होत आहे. (छायाचित्रे- बबनराव वाघ जालना तालुका प्रतिनिधी-_)

मोसंबी नेमक्याच बाजारात घेवुन जान्याच्या अवस्थेत आल्या आणि कोरोनाच्या चपाट्या संपुर्ण विश्वच अडकले. कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले.लॉकडाऊन दरम्याण एकही व़्यापारी मोसंबी खरेदी करण्यासाठी बागांकडे फिरकला नाही.व्यापा-याच्या प्रतीक्षेत शेतकरी दिवाळखोर झालाय. मोसंबी उन्हात तळुन पिवळ्या पडत असुन सुकल्यामुळे गळुन पडत आहेत. शेतक-यांचे लाखो रुपयाचे नुकसान होत असुन लावलेला खर्च देखील निघाला नसुन फक्त नुकसानच हाती लागत आहे. प्रशासनाने सदर नुकसान लक्शात घेता मोसंबीच्या शेताचे पंचनाने करुण मोबदला द्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक