Breaking News
घनसावंगी तालुकाजालना जिल्हातंत्रज्ञान

घनसावंगीत “गूगल क्लासरूम, झूम अॅप, व्हाट्सएप, यूट्यूब चे माध्यमातून अध्यापन

मॉडेल कॉलेज घनसावंगी येथील प्राध्यापकांचा उपक्रम”

घनसावंगी न्यूज प्रतिनिधी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद चे घटक महाविद्यालय मॉडेल डिग्री कॉलेज घनसावंगी येथे महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभाग आणि विद्यापीठाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मार्गदर्शन करण्यात येत आहे. येथील प्राध्यापक झूम ॲप, व्हाट्सअप युट्युब गूगल क्लासरूम यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी मोलाचे मार्गदर्शन करत आहेत.

झूम च्या साह्याने असे विद्यार्थी कनेक्ट होऊन आपले शंका व अभ्यासा विषयी मार्गदर्शन करत आहेत

कोरोनाव्हायरस लॉक डाऊन च्या अंमलबजावणीसाठी वजा व्हायरसच्या रोखण्यासाठी प्रसार रोखण्यासाठी या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने परीक्षा विषयी मार्गदर्शन, पाच क्रमिक पुस्तकांची माहिती, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, प्रोजेक्ट वर्क, विद्यार्थ्यांच्या शंका-कुशंका या घरबसल्या ॲपच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. उच्च शिक्षण विभाग व आपदा प्रबंधन यांच्या निर्देशानुसार 30 एप्रिल पर्यंत लॉक दाबून असल्यामुळे या तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे, परीक्षेविषयी भीती दूर व्हावी, उर्वरित पाठ्यक्रम पूर्ण भाग, यासाठी आमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभाग व आपदा प्रबंधन विभाग विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या निर्देशानुसार झुम ॲप युट्युब गुगल क्लासरूम व्हाट्सअप यांचा उपयोग अध्यापनासाठी करत आहेत असे प्राचार्य डॉ. विश्वास कदम यांनी सांगितले. आम्ही आमच्या प्रत्येक विषयाचे व्हॉट्सऍप ग्रुप बनवलेले आहेत त्यावर ती आम्ही महत्त्वाच्या सूचना आणि व्हिडीओ क्लिप ऑडिओ क्लिप टाकून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहोत तसेच युट्यूब वरती सुद्धा काही महत्त्वाची माहिती प्रसारित करीत आहोत याचा विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. असे प्राध्यापक डॉ. कनूलाल विटोरे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक