अंबड तालुकाजालना जिल्हा

औरंगाबादवरून येणाऱ्या वाहनाला किनगाव पाटीवरच प्रवेश बंद

अंबड तालुक्यातील किनगाव चौफुली चेकपोस्टवर औरंगाबाद कडुन अंबड कडे जाणाऱ्या वाहनांची कसुन तपासणी केली जाते.

विनापरवाना :- वाहनास जालना जिल्हा प्रवेश नाही.

जामखेडन्यूज :- सध्या सर्वत्र जिल्हाबंदी करण्यात आलेली आहे त्यातच रेड झोन असलेल्या औरंगाबाद जिल्हयातून जालन्यात येण्यासाठी किनगाव पाटी हा महत्वाचा पॉइंट असल्याने एकही विनापरवाना वाहन ह्या पाटीवरून पोलीस पास होऊ देत नाही.
अंबड तालुक्यातील अंबड – औरंगाबाद, जामखेड – जालना राज्य मार्गावरील किनगाव चौफुली मार्गे परजिल्ह्यातील नागरिक जालना जिल्हा येऊ नये. म्हणुन किनगाव चौफुली येथे पोलीसांनी दोन्ही राज्यमार्गवर नाकेबंदी केली.
किनगाव पासुन आठ ते दहा किमी अंतरावर सोलापूर – औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
तसेच औरंगाबाद येथे अंबड तालुक्यातील हातांवर काम करुन शहरात, एमआयडीसी पोटभरण्यासाठी गेले आहेत. परंतु कोरोना विषाणुचा वाढता प्रभावामुळे राज्यात औरंगाबाद लाॅकडाऊन वाढल्याने लोक मोठ्या प्रमाणात गावाकडे परत निघाले आहे. औरंगाबाद, जामखेड वरुन अंबड, जालना जाण्यासाठी किनगाव चौफुली चेकपोस्ट मार्गे जावे लागले. परजिल्ह्यातुन जालना जिल्ह्यात येण्याऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
गावागावात संचारबंदी उल्लंघन करून फिरणाऱ्या वाहनांधारकाचे वाहनं जप्त केली जात आहे. तसेच पोलीस कर्मचारी वाहनांची कसुन तपासणी केली जाते. पोलीस प्रशासनाची आँनलाईन परवानगी नसलेल्या वाहनधारकांना पुढे न जाऊ देता माघारी पाठविण्यात येते.
यावेळी किनगाव चौफुली चेकपोस्टवर दिवसा – रात्री तपासणी केली जाते. जालना मुख्यालयातील पोलीस काॅस्न्टेबल ज्ञानेश्वर क्षीरसागर, पी.डी.हिवाळे पोलीस उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक