जालना जिल्हातंत्रज्ञान

द्राक्ष खरड छाटणीचे व्हिडिओद्वारे द्राक्षतज्ञाचे मार्गदर्शन

अकोलादेव न्युज/ बि.डी सवडे
ऍग्रो इंडिया गट शेती संघाचा १८१ वा कार्यक्रम रविवारी झुम ऐप अभिनव व्हिडिओ अशा कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडला. या कार्यक्रमात बोलताना सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी,नाशिकचे द्राक्षतज्ञ मंगेश भास्कर यांनी यावेळेस द्राक्षाच्या खरड छाटणी विषयी जवळपास दीड तास अतिशय सखोल माहिती दिली. यावेळी त्यांनी दहा ड्रम थेअरी तसेच वाढ निरोधकांचा वापर मे-जुन मध्ये न केला तरी जालना जिल्ह्यात अडचण येत नाही असे ठामपणे सांगितले. या कार्यक्रमात डॉ यस.यस. बैनाडे यांनी सध्याच्या कापूस विक्रीतील येत असलेल्या अडचणी तसेच भविष्यातील कापूस लागवड याबाबत मार्गदर्शन केले तर डॉ यस यस माने यांनी कापसाच्या वेगवेगळ्या जाती बद्दल मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना महाकॉट नागपूरचे श्री जयेश महाजन यांनी मोठ्या प्रमाणात कापसाच्या एकाच जातीची लागवड करून पुढे कॉटन टू क्लॉथ ही संकल्पना सविस्तर समजून सांगितली त्यावर भगवान बनकर,भगवान कापसे, ब्रह्म वडगाव चे भिशे यांनी यावर्षी आपण पाचशे एकरवर ही संकल्पना राबवण्याचा मनोदय व्यक्त केला .डॉ भगवानराव कापसे यांनी डाळिंबावर सर्वांनी लक्ष केंद्रित करावे आणि औरंगाबाद जवळील आडगाव सरक येथील श्री अशोक पठाडे तर नांदखेडा येथील रतन पवार यांच्याप्रमाणे डाळींब केल्यास त्यातून द्राक्ष पेक्षाही जास्त उत्पन्न मिळू शकते असे ठामपणे सांगितले. त्यासाठी केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र ,सोलापूर येथील डॉ शर्मा मॅडम, श्री युवराज शिंदे तर नागपूरचे डॉ मराठे ,असे देशपातळीवर डाळिंब तज्ञ आपणास मार्गदर्शन करण्यास तयार आहेत असे ठामपणे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ एस बी पवार यांनी उन्हाळी मिरची माहिति दीली तसेच कापसा बरोबरच इतर पीकसुद्धा आपण पुर्ण तंत्रज्ञान वापरून केल्यास त्यातून सुद्धा आपल्या गटास कापसा इतकाच फायदा मिळू शकतो असे सांगितले. या कार्यक्रमात अकोला देवीचे श्री लक्ष्मण सवडे दरेकर मामा, भाऊराव आटपळे , दत्तू सवडे तर नांदखेड चे श्री शरद सवडे ,भरत सवडे, रतन पवार ,देळेगव्हाण चे भगवान बनकर, भगवान कापसे ,संतोष बोर्डे ,जगन बनकर, शिवाजी भिसे ,दिपक हिवाळे डोणगाव चे सरपंच श्री जाधव, राजू घोडके,उमरखेडचे वैजनाथ बापू फुके, नवनाथ फुके, खामखेड चे शिवाजी नागवे, भातोडीचे, रामेश्वर गायके, सदस्य ,सावरगाव चे गणेश मस्के, ब्रह्मवडगाव तालुका परतुर येथील भिसे व इतर गट शेती सदस्य अशा जवळपास ३४ ते ३५ जणांनी भाग घेतला . द्वादस कार्यक्रम वीडियो कॉन्फेरन्सिंगच्या आयोजीत करण्यासाठी शरद सवडे, रतन पवार व राजू घोडके यांनी सर्व तांत्रिक तयारी चार दिवसापासून केली होती, ऍग्रो इंडिया गट शेती संघाचा अशाप्रकारचा हा सलग दसरा कार्यक्रम वीडियो कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पड्ला.हा कार्यक्रम जवळपास पावणेतीन तास चालला,शेवटी डॉ भगवानराव कापसे यांनी करोना बाबत सर्वांनी अत्यंत काळजी घ्यावी विरुद्ध हे महा युद्ध जिंकण्यास मदत करावी असे आवाहन केले आणि सर्वांचे आभार मानून द्वादस कार्यक्रमच समारोप केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक