परतूर तालुका

परतूरच्या पेट्रोल पंप धारकांची मनमानी :पेट्रोल फक्त सात ते दोन वेळेत..?

पेट्रोल पंप धारकांची मनमानी
परतुर न्यूज/ दीपक हिवाळे :-

अत्यावश्यक सेवेत महत्वाचे दुवा असलेला भाग हा म्हणजे पेट्रोल पंप आहे मात्र परतूर येथील पंप धारकांनी पेट्रोल फक्त सकाळी सात ते दुपारी दोन च्या वेळेत देण्यात येईल असे निवेदन दिल्यानंतर मात्र दिवसभर सर्वसामान्यकडून पेट्रोल पंप चोवीस तास सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.
परतुर येथील पेट्रोल पंप डीलर असोशिएशन पेट्रोल पंप धारक मनमानी करत आसुन मनमर्जी वागत आहेत. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरातून सहकार्य मिळत असताना मात्र परतूर येथील पेट्रोल पंप धारक मर्जीप्रमाणे वागत आहेत पेट्रोल व डिझेल देण्याचे त्यांनी वेळ ठरवली असून सकाळी ०७ ते दुपारी ०२ पर्यंतच पेट्रोल व डिझेल मिळेल असे निवेदन त्यांनी परतुर येथील उपविभागीय अधिकारी यांना दिलेले आहे त्यांनी दिलेले निवेदन नियमानुसार आहे का ? याच वेळेत अत्यावश्यक सेवेतील लोकांनी यावे का, एखाद्याला रुग्णालयात जायचे असेल तर सात ते दोन वेळेतच जावे का,किंवा रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेसाठी लागणाऱ्या पेट्रोल व डिझेल धारकांची गैरसोय होणार नाही का असे असंख्य प्रश्न नागरिकांतून उपस्थित केले जात आहे.सर्व बाबीचा विचार करून सकाळी सात ते दोन वेळ ठेवणे हे योग्य आहे का हा प्रश्न मात्र सर्वसामन्यातुन विचारला जात आहे.

परतूर:- अशा प्रकारचे निवेदन उपविभागीय अधिकारी परतूर यांना देण्यात आले आहे

अत्यावश्यक सेवा देणाऱ्याना पेट्रोल व डिझेल हे सकाळी ०७ ते दुपारी ०२ पर्यंतच मिळणार असे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे. परंतु शेतकरी हा सर्व कामे करूनच शेतीच्या कामासाठी पेट्रोल-डिझेल घेण्याकरिता शेतकऱ्यांनी सुद्धा या वेळेतच यावे का ? शेतकऱ्यांना याचा त्रास झाल्याशिवाय राहणार नाही . शेतीचे सर्व काम सोडून पेट्रोल डिझेल साठी पेट्रोल पंपावर यावे लागेल. परतूर पेट्रोल पंप धारकांनी घेतलेली भूमिका योग्य आहे का ? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंप धारकाचे आडमुठे धोरण आत्यावशक सेवा देणार्‍यांच्या माथी पडणार आहे का ? शासनास व नागरिकास सर्वस्तरातून सहकार्याची भावना निर्माण होत असून परतूर येथील पेट्रोल पंप मात्र मनमानी कारभार करीत आहेत. पेट्रोल पंप हे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या मध्ये येत असुन 24 तास सेवा देणे अनिवार्य आहे. पेट्रोल पंप सुरू ठेवणे अनिवार्य आहे या काळात तर असा विचारच करू नये. पेट्रोल पंप धारकांनी घेतलेली भूमिका ही अयोग्य आहे असा नागरिकाचा सूर निघत आहे तसेच 24 तास पेट्रोल पंप सुरू ठेवावे असे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांकडून मागणी होत आहे.

अत्यावश्यक पासेस व शेतकरी वर्गातून येणाऱ्याची संख्या अधिक असून पेट्रोल कमी का दिले जाते म्हणून कधी पंप व शेतकरी यांच्यात खटकेसुद्धा उडत आहे .पंपधारक मात्र समझोता करून पेट्रोल देण्याचे काम करत आहेत जिल्हाधिकारी यांनीही पेट्रोल बाबतचे निकषच्या बाबतीत फेरविचार करावा जेणेकरून कोणाचीही गैरसोय होणार नाही . तर शासनाणे पेट्रोल बाटलीत देणाऱ्या पंपावरवर ही कारवाई चे संकेत दिले असल्याने अनेकांना ट्रॅक्टर आणता येत नाही तर बाटलीत पेट्रोल, डिझेल चीही मागणी होत आहे त्यामुळे सुद्धा अनेक वाद होत आहेत हे ही तितकेच गरजेचे त्यातही पोलीस संरक्षण देऊन पेट्रोल वाटप केल्यास वाद उधभवणार नाही असे काही पेट्रोल पंप धारकातून सांगितले जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक