Breaking News
बदनापूर तालुका

वाळूवाहतूक करताना पोलिसांनी पकडला हायवा

बदनापूर न्यूज :-
 जिल्हाभरात जमावबंदी असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहतूक बंद आहे त्याचप्रमाणे जिल्हाभरात पेट्रोल – डिझेल ही अत्यावश्यक सेवा वगळून बंद असतानाही अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरूच असल्याचे चित्र असून मांजरगाव दुधना नदीच्या पत्रातून हायवा वाळू भरून जात असतांना पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांनी रंगेहाथ पकडले तर बदनापूर पोलिसांनी सोमवारी हायवा पकडून गुन्हा दाखल केला आहे.मात्र याबाबत महसूल प्रशासन मूग गिळून गप्प आहे हे विशेष .
  जालना – औरंगाबाद महामार्गावर बदनापूर पासून जवळच असलेल्या वरुडी या गावाजवळ 18 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पोलिस उपनिरीक्षक पूजा पाटील व पथक हे जमावबंदी आदेशाचे पालन करत असताना गस्त घालत असतानाच एक विना क्रमांकाचा हायवा अवैधरित्या उत्खनन बंद असताना वाळू भरून वाहतूक करून आढळून आला विशेष म्हणजे या हायवाचा क्रमांक ओळखू येऊ नये म्हणून क्रमांक लिहिलेल्या पाटीवर खाडाखोड करून क्रमांक ओळखता येऊ नये असे केलेले आहे. या वाहनामध्ये असलेल्या अवैध उत्खननाबाबत पोलिस उपनिरीक्षक पाटील यांनी हायवा ताब्यात घेऊन थेट पोलिस ठाण्यात आणला. 
  तर 20 एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक मारोती खेडकर रात्र पाळी करीत असतांना पहाटे मांजरगाव शिवारात नदी पत्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन  करीत असल्याची माहिती मिळताच खेडकर यांनी मांजरगाव गाठून हायवा ताब्यात घेतला व थेट पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल केला तर दुसरा हायवा  त्या ठिकाणी नादुरुस्त अवस्थेत पंचर झालेला व काचा फुटलेल्या अवस्थेत दिसून आला असता मंडळ अधिकारी लक्षमन कळकुंभे व तलाठी भागवत वाघ यांनी पंचनामा करून पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक