देशविदेश

धक्कादायक ..! मुंबईतील ५३ पत्रकारांनाही कोरोनाची लागण

मुबंई :-
राज्यातील जनतेला कोरोना बातमीचे अपडेट देण्यासाठी काम करत असलेले पत्रकारच कोरोनाचे शिकार झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत पत्रकार संघटनेने डॉक्टर सारखा पत्रकाराचा ही संरक्षण विमा काढण्याची मागणी राज्य पत्रकार संघाने केली आहे
राज्यात कोरोनाचे संकट घोंघावू लागल्यापासून राज्यातील जनतेला कोरोनाशी संबंधित बातम्या देणाऱ्या मुंबईतील ५३ पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी केल्या जाणा-या उपाययोजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या फिल्डवर कार्यरत असलेल्या सुमारे १६७ पत्रकारांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आज (दि. २०) प्राप्त झाला आहे. त्यामध्ये मोठ्या संख्येने पत्रकारांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने माध्यम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

राज्यात कोरोनाच्या संकटाची चाहूल लागल्यापासून काही माध्यमातील पत्रकार आजही फिल्डवर आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. खबरदारी म्हणून मुंबईतील फिल्डवर काम करणा-या पत्रकार, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यांची राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्यावतीने कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. विविध माध्यमात कार्यरत असणा-या एकूण १६७ पत्रकारांची गेल्या गुरुवारी कोरोना चाचणी करण्यात आली. एकूण १६७ पत्रकारांच्या चाचण्यामधील काही पत्रकारांचे चाचणी अहवाल सोमवारी आले असून, त्यापैकी ५३ पत्रकार पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आणखी काही पत्रकारांचे चाचणी अहवाल येणे बाकी आहे असल्याचे सांगण्यात येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक