Breaking News
जालना तालुका

ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायीक लाँकडाऊन मुळे सापडले संकटात

सिंधीकाळेगाव न्यूज :-

कोरोना वायरसचे विश्वव्यापी युध्द सुरू आहे. संपुर्ण भारतात लाँकडाऊन सुरू आहे.कोरोना विषाणुने ग्रामीण भागातील जनजीवन तसेच ग्रामीन भागातील शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणुन दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथील बहुसंख्य शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणुन दुग्ध व्यवसाय करतात परंतु संध्या कोरेना विषाणुमुळे संपुर्ण भारतात लाँकडाऊन असल्याने सर्व दुग्ध व्यवसायचे दुध घरीच राहते काही दुग्ध व्यवसाय शेतकरी जवळच असलेले रामनगर परिसरात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाँटेल्स, स्वीट मार्ट, ज्युस सेंटर आदी व्यवसायकडुन दुधाची मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु लाँकडाऊनमुळे सर्व दुकाने बंद आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दुधाचे करायचे काय असा प्रश्न दुग्ध व्यवसायीकांना पडला जनावरांना जेवढे पशुखाद्य लागायचे तेवढे लागतेच .एवढे करुनही दुध हे खराब होणारी वस्तु आहे . आता फक्त घरगुती ग्राहकांनाच दुध पुरवठा केला जातो. उन्हाळ्यामध्ये 40 ते 50 रुपये लिटर भावाप्रमाणे विकणारे दुध आता कोरोनाच्या संकटामुळे आता 25 ते 30 रुपयांच्या भावाने विकण्याची वेळ आली आहे असे दुग्ध व्यवसाय करणारे तुळशीराम गिराम यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक