परतूर तालुका

पिंप्रुळा येथील घरास आग;एक लाख तीस हजारांचे नुकसान.

परतूर/न्यूज-

तालुक्यातील मौजे पिंप्रुळा येथील शेतकरी वचिष्ट मुंजाजी गाडगे यांच्या राहत्या घरास दि.२० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली.त्यामध्ये त्यांच्या घरातील शेतीमालाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या बाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील मौजे पिंप्रुळा येथील शेतकरी वचिष्ट मुंजाजी गाडगे हे त्यांच्या कुटुंबासोबत शेतात गेलेले असतांना आज सोमवार दि.२० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरातून अचानक धूर येत असतांना शेजारील लोकांनी बघितले त्यावेळी घरास अचानक आग लागली.

पिंप्रुळा:- येथील घरास आग लागून एक लाख तीस हजारांचे नुकसान झाले यात संसारउपयोगी साहित्य जळून खाक झाले

या आगीत जीवनावश्यक वस्तु सह घरात असलेले ९ क्विंटल कापूस,८ क्विंटल सोयाबीन,६ क्विंटल तूर,३ क्विंटल ज्वारी आणि २० किलो तुरीची डाळ हे अन्नधान्य तसेच घरात असलेली एक जुनी स्कुटी असे एकूण १ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत तात्काळ महसूल विभागाच्या वतीने तलाठी अरुण कुलकर्णी यांनी पंचनामा केला.आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.परंतु ही आग दुपारी लागल्याने शॉर्टसर्किट झाल्याचा अंदाज बांधला जात आहे.पुढील कार्यवाहीसाठी तहसील प्रशासनाला अहवाल सादर करण्यात आला.यावेळी भगवान आढाव,तात्याराव गाडगे,शिवाजी गाडगे,उमेश गाडगे,गणेश गाडगे,शिवाजी चाळक,ज्ञानेश्वर गाडगे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक