भोकरदन तालुका

बँकेचे प्रिंटींग मशीन बंद : खातेदारांची गैरसोय

रेणुकाई पिंपळगाव :- बँकेतील प्रिंटींग मशीन बंद असल्याने मात्र खातेदारांची गैरसोय होत असून याकडे वरिष्ठांने लक्ष देण्याची मागणी होत आहे .सध्या कोरोणा व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन व संचारबंदी सुरू आहे.परंतु याच काळात बॅंकांमधील पासबुक प्रिटींग मशीन बंद ठेवण्यात आले आहे.पैसे जमा झाले कि नाही याची खात्री करण्यासाठी ग्राहकांना अडचणी येत आहे.परिणामी अनेक ग्राहक रांगेत उभे राहून पैसे जमा झाले कि नाही याची खात्री करतात.केवळ पैशाची खात्री करण्यासाठी ग्राहकांना बॅंकेत गर्दी करावी लागत आहे.त्यामुळे बॅंकांनी पासबुक प्रिटींग मशीन सुरू कराव्या अशी मागणी पिंपळगाव रेणुकाई व पारध परिसरातील बॅंकेच्या ग्राहका मधुन होत आहे.केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शेतकरी पुरुष महिला व दिव्यांग व्यक्तिसाठी मदत येत आहे. आपल्या बॅक खात्यात रक्कम जमा झाली की नाही याची शहानिशा करण्यासाकरिता ग्राहक बॅंकेत काउंटरवर गर्दी करत आहे.त्यामुळे सोशल डिस्टिंन्सिंगचा पुरता फज्जा उडत आहे.विशेष म्हणजे पिंपळगाव रेणुकाई व पारध परिसरातील बहुतांश बॅंकांमधील पासबुक प्रिटींग मशीन बंद आहेत.काही बॅंकामधील मशीन कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे हेतुपुरस्कर बंद ठेवण्यात आले आहे. बॅंकामधील अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी तसेच कामाचा ताण व ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी पासबुक प्रिटींग मशीन सुरू करव्यात यासाठी जिल्हा अधिकारी व संबंधित बॅंकेच्या वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनमधुन होत आहे.या साठी स्थानीक लोकप्रतिनिधींनी सुध्दा या महत्त्वाच्या विषयांवर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक