Breaking News
घनसावंगी तालुका

दोन जणावर तेवीस गावचा भार :संख्या वाढविण्याची मागणी


रांजणी न्युज/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील पोलिस चौकीत फक्त दोन पोलिस कर्मचारी कार्यरत असून या दोन कर्मचा-यांना 23 गावांची कायदा व सुव्यवस्था राखण्याचे प्रयत्न करावे लागत आहे. त्यामुळे येथे पोलिसांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.
रांजणी पोलिस चौकी अंतर्गत परिसरातील 23 गावे येतात. या चौकीत पूर्वी 1 पोलिस उपनिरीक्षक व 4 पोलिस जमादार कार्यरत होते. परंतु सध्या येथे फक्त 1 पोलिस उपनिरीक्षक व दोन पोलिस जमादार कार्यरत आहेत. त्यामुळे या कर्मचा-यांना 23 गावांची कायदा व सुव्यवस्था राखण्याचे अयशस्वी प्रयत्न करावे लागत आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे राज्य शासनाने संचारबंदी जाहीर केली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू करुन सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे 23 गावांतील कायदा व सुव्यवस्था हाताळण्याचे काम फक्त 3 जणांना करण्याची वेळ आली आहे. तसेच येथील पोलिस चौकी ग्रामपंचायतच्या जागेत सुरु असून येथे कर्मचा-यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. येथे पोलिसांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. तसेच शौचालयाची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. येथे पोलिस ठाण्यासाठी निजामकाळापासून जागा उपलब्ध आहे. परंतु पोलिस प्रशासन या बाबीला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे.

याबाबत यांनी सांगितले की,

शिवाजी बनटेवाड पोलीस निरीक्षक घनसावंगीयाप्रश्नी वरीष्ठाकडे याबाबत मागणी केलेली आहे. कर्मचारी मिळाल्यास देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक