जालना जिल्हा

जिल्हात अत्यावश्यक सेवा सकाळी सात ते दुपारी दोन पर्यत चे जिल्हाधिकारी यांचे आदेश

आता सर्व अत्यावश्यक सेवा फक्त सकाळी सात ते दुपारी दोन
जालना जिल्हाप्रतिनिधी न्यूज

जालना जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने खबरदारी घेत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अत्यावश्यक सेवा देनार्या दुकानांना सकाळी सात ते दोन याच वेळेत आपली दुकाने चालू ठेवण्याचे आदेश काढले असून अधिक काळ दुकाने चालु ठेवनारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जारी केले आहेत. यात अत्यावश्यक सेवेतील पेट्रोल पंप, भाजीपाला, मेडिकल,किराणा दुकान, घरगुती गॅस,दुध,फळभाज्या यांचा समावेश आहे.

जालना:- अश्या प्रकारचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत

राज्य व केंद्र शासनाच्या वतीने विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात प्रतिबंधात्मक करण्यासाठी शासनाकडून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानदारांना सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सेवा देऊन त्यानंतर आपली दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले असून नागरिकांना याच वेळेत खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे यामुळे जिल्ह्यात जालना शहर व सर्वत्र ठिकाणी अत्यावश्यक सेवेतच दुकाने चालू राहतील इतर सर्व आस्थापने बंद राहतील असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सोमवारी रात्री काढले आहे. सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत दूध विक्री फळे भाजीपाला विक्री किराणा दुकान पेट्रोल पंप घरगुती गॅस व औषधी दुकाने इत्यादी चालू राहतील यावेळी व्यतिरिक्त कोणी आपले दुकान चालू ठेवल्यास संबंधित व्यक्तीवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 आदेशाचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक