Breaking News
जालना जिल्हा

बँकांनी शेतकऱ्यांना ३० एप्रिल पासून पीककर्ज देण्याची मुख्यमंत्र्यांनाकडे मनसेची मागणी


मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांची मागणी

जालना जिल्हाप्रतिनिधी न्यूज – जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या ३० तारखेपासून पीककर्ज (क्रोप लोन) वाटप करण्यात यावे अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात सोळंके यांनी नमुद केले आहे की, खरीप हंगामाच्या पुर्व मशागतीच्या कामांना आता सुरुवात झालेली आहे.नांगरणी, उन्हाळी पाळ्या, मोगडा, रोटाव्हेटर या कामाला सुरुवात झालेली आहे.कोरोना सारख्या साथीच्या रोगांमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे.या शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी लवकर निर्णय घ्यावा. सगळ्या शेती कामासाठी खूप खर्च आणि या सगळ्याच कामाला नगदी पैसे लागतात. अशा वेळी लवकर पीक कर्ज मिळाले तर शेतकरी अडचणीत येणार नाही.यावर्षी कोरोना सारख्या साथीच्या रोगांमुळे जागतिक संकट आल्यामुळे त्या संकटात सगळेच सापडले आहेत. पण खास करून शेतकरी या संकटात प्रामुख्याने सापडला आहे.या १५ दिवसात जालना जिल्ह्यात ४ वेळा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालेला आहे.यामुळे सुद्धा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.दरवर्षी पीक कर्ज वाटप करताना बँक वेगवेगळे निकष व नियम लावून शेतकऱ्यांना पीक कर्ज देत असतात.परंतु या वर्षी असे न करता सर्वच बँकांनी शेतकऱ्यांना पिक कर्ज देताना एकच निकष व एकच नियम ठेवून पिक कर्ज वाटप करावे. सध्या कोरोना सारख्या संकट बघता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या वर्षी पीक कर्ज मर्यादा वाढवून मिळावी.हेक्टरी ६० ते ७० हजार रुपये प्रमाणे सरसकट शेतकऱ्यांना पिक कर्ज उपलब्ध करून द्यावे.तसेच सर्व बँकांनी एकच नियम ठेवून एक हेक्टरी प्रति ६० ते ७० हजार रुपये पीक कर्ज देण्याबाबत बँकांना आदेश द्यावेत.यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल या आधारामुळे शेतकरी जोमाने कामाला लागतील.
यावर्षी पीक कर्जाची मुदत वाढवून मिळावी.तसेच पिक कर्ज दि, ३०/४/२०२० पासून वाटप करण्यास सुरुवात करावी.कारण खरिपाची पेरणी बोटावर मोजण्याइतक्या दिवसावर येऊन ठेपली आहे.मागील अनेक दिवसांचा अनुभव बघता बँक अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोण वेगळाच असतो.परंतु कोरोना सारखे संकट आले आहे अशावेळी यानंतर शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बँक अधिकाऱ्यांचा बदलला पाहिजे.कारण शेतकरी सुद्धा एक माणूस आहे. तो खूप कष्ट करून आपली जबाबदारी पार पाडत असतो. शेतात काम करताना त्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते.त्यात लहरी निसर्ग, आर्थिक अशा संकटात तो कधी सुटताना दिसत नाही.परंतु त्यांनी आपले कष्ट आपली निष्ठा ठेवूनच अनेक वर्षापासून पुढे पाऊल टाकत आलेला आहे. बँकेत अनेक वेळा त्यांना हाकलुन दिल्या जाते.शेतकऱ्यांच्या समस्याचे समाधान केले जात नाही.अशा वेळी बँकेत एका अधिकाऱ्याची नेमणूक करून येणाऱ्या शेतकऱ्यांचे समाधान झाले पाहिजे, अशा प्रकारचे नवीन नियम लागु करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणी साठी पीक कर्ज उपलब्ध करूण ३० एप्रिल पासून पीक कर्ज वाटप करण्या बाबत बँकांना आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक