जालना जिल्हा

त्या 21 अधिकाऱ्यांना बजावल्या नोटीसा…

जालना न्यूज :- जालना जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यात कसूर करण्याबरोबरच रेडझोन मध्ये असलेल्या शेजारच्या औरंगाबाद व बुलढाणा जिल्ह्यातून अपडाऊन करणाऱ्या विविध विभागाच्या प्रमुख असलेल्या २१ अधिकाऱ्यांना आज मंगळवारी जिल्हाधिकारी श्री रवींद्र बिनवडे यांनी कारणे दाखवा नोटीस बाजावल्यामुळे अधिकारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जालना जिल्हा परिषदेतील सहा अधिकाऱ्यांसह जिल्हा नियोजन विभाग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,सार्वजनिक बांधकाम विभाग,महावितरण कंपनी,नगर प्रशासन, जिल्हा जलसंधारण, महसूल विभाग आदी विभागातील अधिकाऱ्यांचा त्यात समावेश असून येत्या तीन दिवसात नोटीसीचा खुलासा समक्ष माझ्यासमोर सादर करावा नसता आपले काही म्हणणे नाही असे गृहीत धरून नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशाराही या नोटीस मध्ये जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक