जालना जिल्हा

जालन्यातील त्या कोरोना बाधीत महिलेचा रिपोर्ट आला निघेटिव्ह


जालना न्यूज
जालना शहरातील दुखीनगर भागातील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या 65 वर्षाच्या वृद्ध महिलेचा आज चौथा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता जालना जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. या सुखद बातमीमुळे जालना जिल्ह्यातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
हे वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी घेतलेल्या परिश्रमाला अखेर यश आल्याची जालन्यातील जनतेची प्रतिक्रिया आहे.
या महिलेचा चौथा अहवाल हा निगेटीव्ह आला आहे. उद्या बुधवारी या महिलेचा पाचवा नमुनापाठविला जाणार असून, तो निगेटीव्ह आल्यानंतर ती महिला कोरोनामुक्त जाहिर केली जाईल. त्यानंतर जालना जिल्हा कोरोनामुक्त होऊन ग्रीन झोनमध्ये येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक