Breaking News
देशविदेश

वृत्तपत्रे घरो-घरी वितरणाचे नियम खबरदारी बाळगुन शिथील


महाराष्ट्र राज्य पञकार संघाकडून निर्णयाचे स्वागत.

महाराष्ट्र सरकारने दैनिकाचे घरोघरी वितरणासंबंधी निर्बंध घातल्यानंतर स संपादक ,मालक,पञकार यांचेकडून तीव्र संताप व्यक्त झाला. महाराष्ट्र राज्य पञकार संघाने ,मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, राज्यपाल यांना निर्बंध हटवण्यासंदर्भात निवेदन देऊन परिस्थिती ची जाणिव करून दिली.अखेर मंगळवारी सरकार ने ह निर्बंध शिथील करत खबरदारी घेवून, मुंबई व पुणे वगळता इतर ठिकाणी घरोघरी वृत्तपत्रे वाटपा बदल केला आहे.
महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी 18 एप्रिल रोजी एक आदेश काढले होते. त्यानुसार, दैनिक आणि मासीके यांच्या छापाईला मंजुरी दिली होती परंतु, घरो-घरी होणाऱ्या वितरवणावर बंदी लावली होती. 20 एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार असे सांगण्यात आले होते.महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाने नेहमी प्रमाणे तात्काळ मुख्यमंत्री व राज्यपाल यांना निवेदन पाठवून निर्बंध अन्यायकारक असल्याने परत घेण्याची मागणी केली होती.अखेर सरकारने दैनिक आणि मासीकांना दिलासा दिला तरीही वितरणासाठी काही दिशा-निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, ज्या-ज्या ठिकाणी घरो-घरी दैनिक किंवा मासीक टाकले जाणार आहेत, तेथे ते घेणाऱ्याला याची माहिती असायला हवी. तसेच वृत्तपञ घरोघरी टाकणाऱ्या विक्रेत्यास तोंडावर मास्क लावणे आणि सॅनिटायझरचा वापर करतानाच सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. सरकारने वृत्तपत्र आणि मासीकाना दिलेली ही सूट महाराष्ट्रभर लागू होत असली तरीही पुणे आणि मुंबई उपनगरांना यातून वगळण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य पञकार संघासह विविध संघटना व संपादकांनी सरकार दरबारी आवाज उठवतल्याने सरकारने निर्णय घेतला.त्यामुळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश संघटक संजयजी भोकरे,प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे,प्रदेश कार्यध्यक्ष राकेश टोळ्ये,किरण जोशी,ग्रा.प्रदेशाध्यक्ष मनिष केत ,प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव यांनी
मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक