Breaking News
घनसावंगी तालुका

रांजणी परिसरातील नागरिक निघाले शेताकडे, 24 तास विजेची मागणी


रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणीव परिसरातील अनेक कुटूंब शेतामध्ये राहायला जात आहेत. त्यामुळे शेती फिडरचा विद्युत पुरवठा 24 तास सुरु ठेवण्याची मागणी केली जात आहे.
सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसची चर्चा सुरु असून शासनाने लाॅकडाऊनची घोषणा केलेली आहे. तसेच प्रशासनाने जमावबंदीचा आदेश लागू करुन किराणा, मेडिकल, दवाखाने, भाजीपाला व दूधाची दुकाने वगळून संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोरोना हा एकमेकांच्या संसर्गाने होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावात शुकशुकाट दिसत आहे. तसेच अनेक कुटूंब शेतामध्ये राहायला जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेत शिवारात नागरिकांची घरे दिसत आहेत. परंतु शेतामध्ये आजही लोडशेडिंग करण्यात येत असून यामुळे शेतामध्ये राहण्यासाठी गेलेल्या नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या सर्वत्र लाॅकडाऊन सुरु असल्याने शहरातील मोठमोठे कारखाने बंद पडलेले आहेत. तसेच शेतातील अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे विजेचा वापर कमी झालेला आहे. तसे पाहिले तर सध्या शहर व ग्रामीण भागात 24 तास विद्युत पुरवठा सुरू आहे. परंतु शेत शिवारात आजही लोडशेडिंग सुरु असून शेतात राहण्यासाठी गेलेल्या नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. शेतामध्ये फक्त आठ ते दहा तास विद्युत पुरवठा सुरू आहे. वास्तविक शेतात राहण्यासाठी गेलेल्या नागरिकांना सध्या विजेची खुप आवश्यकता आहे. कारण शाळा बंद असल्या तरी शाळांनी विद्यार्थ्यांना घरी अभ्यास दिलेला आहे. परंतु शेतामध्ये विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने विद्यार्थी अभ्यास करु शकत नाही. तसेच पालकांना पिण्याच्या पाण्यासाठी व इतर कामासाठी विजेची गरज असते. तसेच रात्री विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांना कंदिल लावण्याची वेळ आली आहे. सध्या सर्व कारखाने बंद असल्याने विजेची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. त्यामुळे शेतामध्ये कमितकमी एका फ्युजचा विद्युत पुरवठा 24 तास सुरु ठेवण्याची मागणी केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक