घनसावंगी तालुका

बॅंकेसमोरची गर्दी हटेना : सोशल डिस्टंट चा फज्जा

घनसावंगी प्रतिनिधी : नितिन तौर

घनसावंगी तालुक्यातील स्टेट बॅंक ऑफ इंडिया,आय डी बी आय, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक,बॅंक ऑफ महाराष्ट्र,सिंधीकेट बॅंक आदी राष्ट्रीयकृत बॅंकेतुन शासनाकडून आलेले अनुदान काढण्यासाठी व समर्थ सहकारी बॅंकेतुन उसाचे बिल काढण्यासाठी एकच गर्दी केली जात असून सोशल डिस्टंट चा एकप्रकारे फज्जाज पाडल्याचा दिसून येत आहे.
केंद्रशासनाकडुन जनधन खात्यात पाचशे रुपये अनुदान जमा केले गेल्यानंतर हे अनुदान तात्काळ न काढल्यास ते परत जाते अशी एकच अफवा परिसरात पसरल्याने जनधन खातेधारकाच्या रांगा च्या रांगा बॅंकेसमोर लागल्या असून यामध्ये सोशल डिस्टंट चा फज्जा च पाडला असून दुसरीकडे समर्थ सहकारी कारखाण्याचे उसाचे बिलाची खात्यात जमा झालेली रक्कम काढण्यासाठी शेतकऱ्यांनी बॅंकेसमोर एकच गर्दी केली असून सोशल डिस्टंसिंग नेमकी दिसते तरी कुठे असाल सवाल उपस्थित होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक