Breaking News
जालना जिल्हा

रामनगर येथे 81850 रु देशी- विदेशी दारू जप्त

लॉकडाऊन मधे दारु विक्रेतावर पोलिसांची कारवाई


रामनगर/प्रतिनीधी
जालना तालुक्यातील रामनगर येथे जिल्हा भरारी पथक व गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धाड मारुण सत्याहत्तर हजार पंन्नास रुपयांची देशी विदेशी दारु व रोख रक्कम जप्त केली.
२१ एप्रील रोजी सायंकाळी सहा वाजे दरम्यान पोलीस अधिक्षक चैतन्य यांच्या मार्गदर्षनाखाली जालना येथील एस पी पथक व एलसीबी पथकाने राजविर परमीटरुम व बार व अन्य दोन ठिकाणी छापा टाकुन देशी विदेशी दारु सहीत 81850 रुपायाचा मुद्देमाल जप्त केला व मौजपुरी पोलीस ठाण्यात एलसीबी चे पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश रतनसिंग राजपुत यांच्या फिर्यादी वरुन चार जना विरोधात माननिय जिल्हाधीकारी यांचे आदेशाचे उल्लंघन करुन चोरटी दारु विक्री केल्या प्रकणी गुण्हा दाखल करण्यात आला आहे.
या मोहीनेत पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंग गौर, ए एस आय शेख रज्जाक, पोहेका कैलास कुरेवाड, पोकॉ शामलीन कांबळे, सुरेश गिते, प्रशांत देशमुख, गोकुळसिंग कायटे,चंदनसिंग बहुरे, हिरामन फलटनकर, कृष्णा तंगे, सचिन चौधरी,विलास चेके, संजय राऊत, रमेश पैठणे व महिला पोहेकॉ आशा जायभाये यांनी कामगीरी बजावली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर डी बिराजदार हे करीत असल्याचे ठाणे अमलदार एम व्ही चव्हाण यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक