जालना जिल्हा

कारवाईच्या इशाऱ्यानंतर ते अधिकारी जालन्यात दाखल

जालना:- येथे विविध शासकीय कार्यालयात कार्यरत असलेले प्रमुख अधिकारी आणि काही कर्मचारी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन चे आदेश असतांनाही दररोज अपडाऊन करत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे जिल्हाधिकारी श्री रविंद्र बिनवडे यांनी संबधित अधिकाऱ्यांना काल मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला होता. जालना शेजारी असलेले औरंगाबाद आणि बुलढाणा या दोन्ही जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढलेला असून रुग्णाच्या संख्येत देखील मोठी वाढ झाल्याने औरंगाबाद व बुलढाणा या दोन्ही जिल्ह्यांचा राज्य शासनाने रेड झोनमध्ये समावेश केलेला आहे. असे असतांनाही जालना येथे विविध विभागात कार्यरत असलेले प्रमुख अधिकारी आणि काही कर्मचारी उपरोक्त दोन्ही जिल्ह्यातून दररोज अपडाऊन करत होते. ही बाब लक्षात घेऊन श्री बिनवडे यांनी संबंधित विभागाच्या 21अधिकाऱ्यांना काल मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर खडबडून जागे झालेले बहुतांश प्रमुख अधिकारी काल मंगळवारी रात्री उशिरापर्यंत जालना शहरात दाखल होऊन मुख्यालयी राहण्याची हमी त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक