परतूर तालुका

परतूर शहरातील ग्राहक सेवा केंद्रात ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखूनच व्यवहार

       बँक खातेदारांना होतोय ग्राहक सेवा केंद्राचा मोठा फायदा

परतूर — प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जन-धन खात्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून महिलांच्या खात्यात प्रत्येकी ५०० रुपये जमा झाले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान निधीची रक्कम जमा झाली आहे. बँके व एस.बी.आय ग्राहक सेवा केंद्रातून पैसे काढण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या सकाळपासूनच रांगा लागत असल्याचे चित्र बँक व एस.बी.आय ग्राहक सेवा केंद्रावर पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी ‘सोशल डिस्टन्सिंगकडे विशेष लक्ष दिल्याने ग्राहकांना खात्यावरील पैसे काढण्यासाठी दिलासा मिळत आहे. कोरोनाचा पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दुर्ष्टीने सनीटायझर व स्वच्छता राखून सामाजिक अंतर ठेऊन व्यवहार केला जात आहे. आजच्या या कोरोनाच्या संकटकाळात ग्राहक सेवा केंद्र संचालक नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घेत आपली सेवा चोख बजावताना दिसत आहेत.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांच्या उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली. त्यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून महिलांना तीन महिने पाचशे रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा उपक्रम सुरू केला. योजनेतून जन-धन बचत खाते असलेल्या महिलांच्या बचत खात्यात एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत दरमहा ५०० रुपये जमा केले जात आहेत. त्यामध्ये एप्रिल महिन्यात ५०० रु जमा झाले आहेत. ही रक्कम काढण्यासाठी संबंधित खातेधारकांना थेट बँक किंवा ग्राहक सेवा केंद्रात धाव घेत आहेत.

सध्या महिला बँक व सेवा देणाऱ्या ग्राहक सेवा केंद्रावर रक्कम काढण्यासाठी येत आहेत. ग्रामीण भागातील महिलांना लॉक डाऊन मुळे वाहने नसल्याने सकाळीच घरातून निघावे लागते. महिलाना पायी चालत यावे लागते. शहरातील बँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालू असल्याने नागरिकांना विना विलंब पैसे मिळत आहेत.

यामुळे ग्राहक सेवा केंद्राचा बँक खातेदारांना फायदा होत आहे. ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंग सामाजिक अंतर व सुरक्षितता पाळूनच या ठिकाणी व्यवहार केला जात आहे. नागरीकामधून समाधान व्यक्त केले जात आहे. बँक खातेदारांना ग्राहक सेवा केंद्राचा फायदा होत आहे. सुरळीत व्यवहार होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक