घनसावंगी तालुका

अन् तिनं रेल्वे पटरीच्या बाजूच्या शेतातच दिला बाळाला जन्म

जालना जिल्ह्यातील राजणी भागातील घटना

बाळ आणि आई दोघेही सुखरुप

रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी
ना हाॅस्पिटल जवळ , ना डाॅक्टर चे दवाखाना जवळ ,ना जिल्ह्याच्या ठिकाणी नेण्यासाठी वाहन अशा वातावरणात एका महिलेने रेल्वे पटरीच्या बाजूला राहत असलेल्या शेतातच एका गोंडस बाळाला जन्म दिला.
घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील रेल्वे पटरीच्या कामासाठी आलेल्या मध्य प्रदेश राज्यातील मजूर महिलेने मंगळवारी रात्री गोंडस बाळाला जन्म दिला. लॉकडाऊनमुळे मध्य प्रदेशचे अनेक मजूर गेल्या एक महिन्यापासून शेतात अडकलेले आहेत. लाॅकडाऊनमुळे कुठे जाता येईना आणि कामही करता येईना अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच एका 23 वर्षीय मजूर महिलेला मंगळवारी मध्यरात्री प्रसूती वेदना जाणवू लागल्या. परंतु अशा वेळेस नेमके काय करावे हेच कुणाला समजेना. एखाद्या डाॅक्टरला बोलवावे तर कुणाची ओळख नाही आणि कुणाला फोन करुन बोलवावे तर मोबाईलमध्ये चार्जिंग नाही. अशा विविध विचारात असतानाच मंगळवारी मध्यारात्री दोन वाजेच्या सुमारास एका गोंडस आणि गुटगुटीत बाळाला जन्म दिला. मुन्नीबाईला (नाव) प्रसूती वेदना सुरु होताच इतर मजूर काय करावे, दवाखान्यात जाण्यासाठी ना वाहनाची व्यवस्था, मोबाईलवर संपर्क करावा तर मोबाईलही बंद होते. इतर मजूर चिंतेत प्रार्थना करत होते. तितक्यात झोपडीमध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि सुखरूप प्रसूती झालीची माहिती सर्वांना कळाली. यावेळी सर्वांनी
जितका कोई नही होता, उसका तो खुदा है यारो या म्हणीची आठवण नक्कीच झाली असेल. बाळ व आईची तब्येत ठणठणीत आहे.
आरोग्य विभागाने एकदा तरी शेतात अडकलेल्या मजुरांना भेट देऊन त्यांच्या आरोग्याची तपासणी करावयास हवी. किंवा पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे मत नातेवाईकांनी वक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक