जालना जिल्हा

त्या कोरोनाबाधित महिलेच्या पती, मुलांसह घरातील सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह

जालना:- शिरोडा येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या जवळून संपर्कात आलेल्या पती, मुलं, सासू, सासरे व घरातील नातेवाईक अशा 19 जणांना जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात काल रात्री दाखल करून, त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशालेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 17 जणांचा नुकताच निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. त्या महिलेचे घरातील जवळच्या सर्व नातेवाईकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
त्या महिलेच्या दाढदुखीनंतर प्रारंभी उपचार करणाऱ्या परतूर येथील दोन डॉक्टरांचे देखील रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
जालन्यात तिच्यावर उपचार करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलमधील डॉक्टर व काही कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट उद्या प्राप्त होण्याची शक्यता आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक