Breaking News
जाफराबाद तालुका

जाफराबाद तालुक्यात अकस्मित मृत्यूची नोंद

अकोलादेव न्यूज- जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथील बालाजी उत्तम कापसे (४०) यांचा मंगळवारी सायंकाळी आकस्मित म्रुत्यु झाला. शेतात गेलेले कापसे हे उशीरापर्यंत घरी न आल्याने त्यांचा शोध घेतला असता सायंकाळच्या सुमारास ते अकोलादेव तांडा शिवारात मृत अवस्थेत आढळून आले. त्यांच्या म्रुत्युचे कारण समजू शकले नाही.

बालाजी कापसे

     दरम्यान बुधवारी सकाळी टेंभुर्णी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अकोलादेव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांंच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक म्रुत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय ज्ञानेश्वर साखळे व बीट जमादार क्षिरसागर करीत आहे.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक