घनसावंगी तालुका

घरी जाता येईना अन् काम काही होईना, राजस्थानच्या मजुरांवर उपासमारीची वेळ


रांजणी न्युज/असलम कुरेशी
लाॅकडाऊनमुळे राजस्थान येथील मजुरांना घरी पण जाता येईना आणि कामही करता येईना. त्यामुळे या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की राजस्थान राज्यातील दंतेडी ता. मांडल जि. भिलवाडा येथील आसाराम वेनाजी साळवी व त्यांचे 13 सहकारी विहिरीचे काम करण्यासाठी पाच महिन्यापूर्वी महाराष्ट्रात आले होते. राजस्थानात काम नसल्यामुळे ते दरवर्षी पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्रात येत असतात. परंतु यावर्षी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू झाल्याने सर्वच कामे बंद पडली. यात विहिरीचे काम अपवाद नाही. आसाराम साळवी व त्यांचे सहकारी विहिरीचे काम करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. परंतु लाॅकडाऊनमुळे दिड महिन्यापासून विहिरीचे काम बंद पडले. तसेच जिल्हा बंदीमुळे कुठे जाताही येत नाही. म्हणून काय करावे हेच समजत नसल्याचे या मजुरांनी सांगितले. यासंदर्भात आसाराम साळवी यांनी सांगितले की लाॅकडाऊनमुळे विहिरीची कामे करता येत नाही. काम होत नसल्याने आम्हाला कुणी पैसेही देत नाही. त्यामुळे काय करावे हेच समजत नसल्याचे त्यांनी सांगितले. आसाराम साळवी म्हणाले की काम बंद असल्याने रांजणी येथील एका किराणा दुकानदाराने आतापर्यंत ऊधार किराणा दिला. परंतु उधारी जास्त होत असल्याने ते पण आता किराणा देत नाही. विशेष म्हणजे या मजुरांसोबत महिला व एक दिड महिन्याचा बाळदेखील आहे. काम नसल्याने पैसा दिसत नाही. तसेच प्रशासन आमच्या घरी जाऊ देत नाही. अशा परिस्थितीत काय करावे हेच समजत नसल्याचे त्यांनी सांगितले. एक तर प्रशासनाने आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी किंवा आम्हाला राजस्थानला जाण्याची परवानगी द्यावी, असे ते म्म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक