घनसावंगी तालुका

त्या महिलेची आरोग्य पथकाने घेतली भेट


रांजणी न्युज/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील पारडगाव रेल्वे स्टेशनजवळ शेतात बाळाला जन्म दिलेल्या महिलेची रांजणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने भेट घेऊन त्यांची तपासणी केली.
घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील रेल्वे पटरीच्या कामासाठी आलेल्या मध्य प्रदेश राज्यातील मजूर महिलेने मंगळवारी रात्री गोंडस बाळाला जन्म दिला होता. लॉकडाऊनमुळे मध्य प्रदेशचे अनेक मजूर गेल्या एक महिन्यापासून शेतात अडकलेले आहेत.

न्यूज जालना च्या बातमीची दखल

लाॅकडाऊनमुळे कुठे जाता येईना आणि कामही करता येईना अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच एका 23 वर्षीय मजूर महिलेने मंगळवारी मध्यरात्री एका बाळाला जन्म दिला. लाॅकडाऊनमुळे गेल्या एक महिन्यापासून हे मजुर पारडगाव रेल्वे स्टेशनजवळच्या शेतात अडकले आहेत. काम बंद पडल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. काही नागरिकांनी त्यांना जीवनावश्यक वस्तू वाटप केल्याने कसे तरी त्यांचे दिवस निघत आहेत. परंतु लाॅकडाऊनमुळे कुठे जाताही येत नाही आणि कामही बंद असल्याने या मजुरांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा विविध विचारात असतानाच मुन्नीबाई लगन पवार या युवतीने मंगळवारी मध्यारात्री दोन वाजेच्या सुमारास एका गोंडस आणि गुटगुटीत बाळाला जन्म दिला. ही माहिती आरोग्य विभागाला समजताच रांजणी प्राथमिक स्वास्थ्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यिका शारदा दंदाले, आरोग्य सेवक एस.एस.घोगरे, आरोग्य सेवक रामदास बोनगे व आशा सेविका काळे यांनी शेतातील महिलेच्या कोपीवर जाऊन तिची भेट घेतली. तसेच तिला रांजणी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून येथे वैद्यकीय अधिकारी डाॅ.विशाल ठाकुर यांनी माता व बाळाची तपासणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक