Breaking News
परतूर तालुका

आष्टी येथील बसस्थानक प्रकरण : परिवहन महामंडळाला तहसीलदार यांचे आदेश

बसस्थानकामुळे प्रवाशांची जीवित हानी टाळण्यासाठी उपाययोजना करू अहवाल सादर करा,

परिवहन महामंडळाला तहसीलदार यांचे आदेश

आष्टी(प्रतिनिधी) आष्टी ता.परतूर येथे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन मिशन योजनेअंतर्गत नुकतेच बांधण्यात आलेले बसस्थानक बांधकाम धोकादायक बनले असून प्रवाशांच्या जिवितास धोका निर्माण होऊ नये या करितासामाजिक कार्यकर्ते उद्धव डोळस यांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते त्याची दखल घेऊन तहसीलदार यांनी परतूर आगारास प्रवाशांची जिवीत हानी टाळण्यासाठी उपाययोजना करून अहवाल सादर करवा असे लेखी आदेश काढले आहेत.
याविषयी सविस्तर माहिती आशी की,परतूर तालुक्यातील आष्टी येथे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन मिशन योजने अंतर्गत करण्यात आलेले नवीन बसस्थानक बांधकाम वारंवार वादाच्या भोवऱ्यात अडकले होते त्याच बसस्थानक निवारा शेडला गळती लागली असून निवारा शेडला लावण्यात आलेली पियूपी अचानक पणे कोसळत असल्याने त्यापासून नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे, निवारा शेडला मोठ मोठी भागदाडे पडली असल्याने सदर निवारा शेड हे वापरा योग्य नसून यामुळे प्रवाशांच्या जिवितास धोका निर्माण झाल्याने सामाजिक कार्यकर्ते उद्धव डोळस यांनी तहसीलदार परतूर यांना एका निवेदनाद्वारे कळविले होते, लॉक डाऊन संपण्यापूर्वी सदर इमारतीची पाहणी करावी व प्रवाशां वरील धोका टाळण्यासाठी उपाय योजना करावी असे निवेदनात नमूद केले होते.याची दखल घेऊन परतूर तहसीलदार यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या परतूर आगारास लेखी स्वरूपात पत्र काढून बसस्थानक विषयक कोणतीही जीवितहानी होणार नाही यादुरुस्तीने आवश्यक उपाययोजना करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावा असे पत्रात नमूद केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक